आशियाची अर्थव्यवस्था
आशिया खंडाची अर्थव्यवस्था | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | प्रदेशाची अर्थव्यवस्था | ||
---|---|---|---|
उपवर्ग | जागतिक अर्थव्यवस्था | ||
स्थान | आशिया, पूर्व गोलार्ध | ||
| |||
आशियाच्या अर्थव्यवस्थेत ४.५ अब्ज पेक्षा जास्त लोक ( जगातील लोकसंख्येच्या ६०%) आहे जे ४९ वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये राहतात. [१] आशिया हा सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रदेश आहे. आशियाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी खंडीय अर्थव्यवस्था आहे, दोन्हीसकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) आणि क्रयशक्तीची समानते (PPP) प्रमाणे.[२] शिवाय आशिया हा जगातील काही प्रदीर्घ आधुनिक आर्थिक तेजीचे ठिकाण आहे, जसे जपानी आर्थिक चमत्कार (१९५०-९०), दक्षिण कोरियामधील हान नदीतीरावरील चमत्कार (१९६१-९६), चीनी आर्थिक भरभराट (१९७८-२०१३), इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स आणि व्हिएतनाममधील टायगर कब इकॉनॉमी (१९९०-सध्या) आणि भारतातील आर्थिक तेजी (१९९१-सध्या).
सर्व जगाच्याप्रमाणे, आशियातील संपत्ती राज्यांमध्ये आणि अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्न आहे. हे त्याच्या विशाल आकारामुळे आहे, ज्यात विविध संस्कृती, वातावरण, ऐतिहासिक संबंध आणि सरकारी यंत्रणा आहेत. क्रयशक्तीची समानतेच्या दृष्टीने आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे चीन, भारत, जपान, इंडोनेशिया, तुर्की, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इराण, थायलंड आणि तैवान आहेत. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) च्या दृष्टीने चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, तुर्की, तैवान, थायलंड आणि इराण हे देश आहेत.
एकूण संपत्ती प्रामुख्याने पूर्व आशिया, भारत आणि आग्नेय आशियामध्ये केंद्रित आहे, तसेच सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवैत आणि ओमान यांसारख्या पश्चिम आशियातील तेल समृद्ध देशांमध्ये केंद्रित आहे. [३] [४] [५] इस्रायल आणि तुर्की याही पश्चिम आशियातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था आहेत. इस्रायल (विविध उद्योगांवरील उद्योजकता) एक विकसित देश आहे, तर तुर्की (ओईसीडीचा संस्थापक सदस्य) हा एक प्रगत उदयोन्मुख देश आहे. आशियात सध्या वेगाने वाढ आणि औद्योगिकीकरण होत आहे. त्यात काही प्रगत देश अपवाद आहेत: जपान (जड उद्योग आणि विद्युत अत्याधुनिकता), दक्षिण कोरिया (जड उद्योग आणि माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान), तैवान (जड उद्योग आणि उच्च तंत्रज्ञान भाग निर्मिती), हाँगकाँग (आर्थिक उद्योग आणि सेवा) आणि सिंगापूर (आर्थिक उद्योग, सेवा, पर्यटन) [६]. चीन आणि भारत या जगातील दोन वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत.
विविध देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी, अनेक व्यापार गट स्थापन केले आहेत जसे की: आसियान, शांघाय सहयोग संगठन (SCO), आशिया-पॅसिफिक व्यापार करार (APTA), आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC), गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC), अरब संघ, व दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (सार्क).
संदर्भ
[संपादन]- ^ "Population of Asia in 2014". World Population Statistics. 2019-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2014 रोजी पाहिले.
- ^ www.imf.org http://www.imf.org/external/datamapper/NGDPD@WEO/OEMDC/ADVEC/WEOWORLD. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "Global wealth report". www.credit-suisse.com. Credit Suisse. October 25, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Global wealth report 2019" (PDF). Credit Suisse. October 25, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Global wealth databook 2019" (PDF). Credit Suisse.
- ^ "Asian Economic Integration Reports". 2014-10-15.