क्रयशक्तीची समानता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रयशक्तीची समानता ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी वापरतात. या सिद्धांतामध्ये दोन चलनांच्या दीर्घ मुदतीमधील समतोलावरून त्यांच्या तुलनात्मक क्रयशक्तीचे अनुमान करतात.

क्रयशक्तीच्या समानतेच्या दरात आणि चलनांच्या विनिमय दरात बराच फरक असू शकतो. उदाहरणार्थ, १ अमेरिकन डॉलर बरोबर ७.३९ चिनी युआन असा विनिमय दर आहे (नोव्हेंबर २००७). पण एका डॉलरची क्रयशक्ती मात्र १.८ युआनच्या समान आहे. म्हणजे, अमेरिकेत एका डॉलरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील, त्या विकत घ्यायला चीनमध्ये १.८ युआन लागतील.