Jump to content

आफ्रो-आशियाई परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ. स. १९५५ च्या परिषदेच्या स्थळाचे चित्र

आफ्रो-आशियाई परिषद ही सर्वप्रथम इंडोनेशियातील बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरली. ही परिषद ही आफ्रिका आणि आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांची पहिली औपचारिक परिषद होय. हीच बांडुंग परिषद म्हणून ओळखण्यात येते. भारतासह २९ राष्ट्रांनी ह्या परिषदेत भाग घेतला. दक्षिण आफ्रिका, इझ्राएल, राष्ट्रीय चीन, दक्षिण व उत्तर कोरिया ह्या देशांना आमंत्रण नव्हते. पश्चिमी राष्ट्रांव्यतिरिक्त इतर राष्ट्रांची ही मोठ्यात मोठी परिषद होती. चीनला ह्या परिषदेमुळे प्रतिष्ठा मिळाली.

आढावा[संपादन]

  1. आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांच्या मताची दखल न घेता त्यांच्या बाबतीत धोरण ठरविण्याच्या पश्चिमी राष्ट्रांच्या पद्धतीबद्दल नापसंती व्यक्त करण्यात आली.
  2. सर्व प्रकारच्या वसाहतवादाचा निषेध करण्यात आला.
  3. जागतिक शांतता व सहकार्यासाठी दहा कलमी कार्यक्रम मान्य करण्यात आला.
  4. स्वसंरक्षणार्थ करण्यात येणारे करार मान्य करण्यात आले, पण ज्या करारांनी बड्या राष्ट्रांचा हेतू सफल होणार असेल ते निषेधार्ह ठरविण्यात आले.
  5. भारताने पुरस्कारलेल्या पंचशील त्याचप्रमाणे सहजीवन व निःशस्त्रीकरण या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला.
  6. या परिषदेने अरबांचा पॅलेस्टाइनवरचा अधिकार मान्य केला.तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला.
  7. अलिप्तता आणि पंचशील ह्या दोन धोरणांतील फरक स्पष्ट न झाल्यामुळे परिषदेत वादंग झाले,

परिषदेत सहभागी झालेले देश[संपादन]

बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरलेल्या आफ्रो-आशियाई परिषदेत सहभागी झालेले देश. २९ देशांनी जगातल्या अर्ध्या लोकसंखेचे प्रतिनिधित्व केले. व्हियेतनाम दोनदा दाख्वेण्यात आले आहे (उत्तर आणि दक्षिण).
अलिप्त राष्ट्र संघटनेचे प्रतिनिधी देश(२००७). फिक्कट निळ्या रंगातील देश हे निदर्शक देश होत .

बाह्य दुवे[संपादन]