Jump to content

असिन तोट्टुंकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असिन तोट्टुंकळ
(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍.)
असिन तोट्टुंकळ
जन्म असिन तोट्टुंकळ
ऑक्टोबर २६ १९८५ [वय् २४ वर्षे]
कोच्ची , केरळ
इतर नावे मलबार अळगी,चेन्नै,तमिळ अम्मायी .
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात.
कारकीर्दीचा काळ सन २००१-पासुन
भाषा मल्याळम
प्रमुख चित्रपट गजनी (चित्रपट)
पुरस्कार फिल्मफेअर,स्टारडस्ट,स्क्रीन,IIFA,ITFA इत्यादी.
वडील जोसेफ तोट्टुंकळ
आई सेलीन तोट्टुंकळ

असिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍ ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉनची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.

तेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारमहिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.


पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण

[संपादन]

मूळची केरळची असणारी असिन, केरळी असून तिची मातृभाषा मल्याळम आहे,त्या व्यतिरिक्त तिचे तमिळ, संस्कृत, तेलुगू, इंग्रजी, हिंदी तसेच फ्रेंच भाषांवर प्रभुत्व आहे. मुंबईत आल्यानंतर ती मराठी देखील शिकली आहे असे तिने एका मुलाखतीत नमूद केले. असिन ही आपल्या नावाचा अर्थ 'शुद्ध' किंवा 'पापरहित' असा सांगतात. तिच्या नावातील ’अ’(A)हे अक्षर संस्कृत मधून घेण्यात आले असून ’सिन’ (Sin-पाप) हे इंग्रजी भाषेतून घेतले आहे. दोहोंचा मिळून ’अ+सिन’, पापरहित असा होतो. चित्रपटात येण्यापूर्वी असिनने स्थानिक कंपन्यांच्या जाहिरातीतून काम केले आहे, तसेच काही नामांकित कंपन्यांची ती "ब्रॅंड अम्बॅसेडर" देखील आहे.

जाहिराती आणि ब्रॅंड अम्बॅसेडरशीप

[संपादन]

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट भाषा व्यक्तिरेखा इतर नोंदी/पुरस्कार
2001 नरेंद्रन मकन जयकांतन वक मल्याळम स्वाती
2003 अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी तेलुगू चेन्नै 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तेलुगू)
शिवमणी 9848022338 तेलुगू वसंता 'विजेती', संतोषम सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक,सुपरहिट
2004 लक्ष्मी नृसिंह तेलुगू रूख्मिणी
घर्षण तेलुगू माया सुपरहिट
एम.कुमरन सन ऑफ महालक्ष्मी तमिळ मलबार सुपरहिट
2005 चक्रम तेलुगू लक्ष्मी
उळ्ळम केट्कुमे तमिळ प्रिया
गजनी तमिळ कल्पना 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तमिळ)
मजा तमिळ सीतालक्ष्मी सुपरहिट
सिवकासी तमिळ हेमा सुपरहिट
2006 वर्लारू तमिळ दिव्या
अण्णावरम तेलुगू ऐश्वर्या
2007 आळ्वार तमिळ प्रिया
पोक्किरी तमिळ श्रृती सुपरहिट
वेल तमिळ स्वाती सुपरहिट
2008 दसावतारम तमिळ कोदै राधा,
अंडाळ
'विजेती', ITFA Best Actress Award
नामांकन, विजय सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक
नामांकन, विजय आवडती नायिका पारितोषिक
गजनी हिंदी भाषा कल्पना शेट्टी 'विजेती', फिल्मफेअर Best Hindi Debut Award
'विजेती', IIFA Best Debut Award
'विजेती', Star Screen Best Female Newcomer Award
'विजेती', Stardust Female Superstar of Tomorrow Award
नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक
2009 लंडन ड्रिम्स हिंदी भाषा प्रिया सर्वसाधारण प्रतिसाद
2010 कावलन तमिळ मीरा २४ डिसेंबर २०१० प्रदर्शन
2011 रेडी (2011) हिंदी भाषा संजना २०११ प्रदर्शन
बर्फी हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत
रेस २ हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत
पॉकेटमार हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भदूवे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
(आयएमडीबी वरील पृष्ठ)