चर्चा:असिन तोट्टुंकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या अभिनेत्रीच्या आडनावाचा उच्चार नेमका काय आहे? आत्तापर्यंत थोट्टुमकल, तोट्टुमकल, तोट्ट्म्कल अश्या अनेक आवृत्या येथे दिसल्या आहेत. संदर्भ मिळेल काय?

अभय नातू १५:४६, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

मल्याळम् उच्चारानुसार बदल् करण्यात आला आहे.[संपादन]

असिन तोट्टुम्कल ह्या अभिनेत्री चे आडनाव मल्याळम भाषेतील उच्चारानुसार " तोट्टुंकल " असे आहे. जो काही बदल केला गेला आहे त्यावेळी दुसर्या वर्ड एडिटर मधुन टंकलेखीत केल्याने ते जसे हवे तसे येत नव्हते.आता हे एडिटर (मराठीत काय म्हणतात?) वापरता येते त्यामुळे तो बदल अपडेट करावा हि विनंती. अजुन एक माहिती देऊ इच्छितो : दक्षिणेत खालीलप्रमाणे इंग्रजी स्पेलिंग लिहीण्याची पद्धत आहे . Th - त / द ह्या अक्षरासाठी जसे Thiruvanthpuram / Murthy - तिरुवनंतपुरम / मुर्ती. Namboothiri / नम्बुद्री Kalanithi / कलानिदी/धी zh / L - ळ ह्या अक्षरासाठी जसे Alappuzha / Thamizh अलप्पुळा / तमिळ T - ट ह्या अक्षरासाठी tt - ठ ह्या अक्षरासाठी जसे पेठ - Pett / Pettah dh - द किंवा ध साठी. जसे दशावतारम् - Dhasavatharam D- ड साठी. जसे कुडुम्बम् / kudumbam ( kutumb in marathi )

तमिळ किंवा मल्याळम भाषेतील माहिती किंवा शब्दांसाठी आपण मला संपर्क करु शकता, आपल्या सुचनांचे स्वागत आहे.