अमर अकबर अँथनी
Appearance
(अमर-अकबर-एंथनी या पानावरून पुनर्निर्देशित)
अमर अकबर अँथनी | |
---|---|
दिग्दर्शन | मनमोहन देसाई |
निर्मिती | मनमोहन देसाई |
प्रमुख कलाकार |
विनोद खन्ना ऋषी कपूर अमिताभ बच्चन शबाना आझमी नीतू सिंग परवीन बाबी निरुपा रॉय प्राण जीवन |
छाया | पीटर परेरा |
गीते | आनंद बक्षी |
संगीत | लक्ष्मीकांत प्यारेलाल |
पार्श्वगायन |
मोहम्मद रफी किशोर कुमार लता मंगेशकर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २७ मे १९७७ |
|
अमर अकबर अँथनी हा १९७७ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक व निर्माता मनमोहन देसाई आहेत. ह्यात विनोद खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, शबाना आझमी, नीतू सिंग, परवीन बाबी, निरूपा रॉय, प्राण आणि जीवन प्रमुख भूमिकेत आहेत.
कथानक
[संपादन]तीन भाऊ लहानपणी रॉबर्ट नावाच्या (जीवन) एका गुन्हेगारामुळे वेगळे होतात व त्यांना तीन वेगळ्या धर्मांची कुटुंबं दत्तक घेतात. बावीस वर्षांनंतर, ते वेगळ्या नाव व धर्मांचे दाखवले जातात; पहिला भाऊ अमर खन्ना (विनोद खन्ना) नावाचा हिंदु पोलीस अधिकारी बनतो, दुसरा भाऊ अकबर इलाहाबादी (ऋषी कपूर) नावाचा मुस्लिम कव्वाली गायक असतो, आणि तिसरा भाऊ अँथनी गोंजाल्विस (अमिताभ बच्चन) नावाचा ख्रिश्चन दारू विक्रेता असतो. ह्या तीन भावांची कशीतरी पुन्हा भेट होते व ते रॉबर्टकडून त्यांना वेगळं केल्याचा बदला घ्यायचा ठरवतात.
कलाकार
[संपादन]- विनोद खन्ना - इन्स्पेक्टर अमर खन्ना
- ऋषी कपूर - अकबर इलाहाबादी
- अमिताभ बच्चन - अँथनी गोंजाल्विस
- शबाना आझमी - लक्ष्मी आनंद
- नीतू सिंग - डॉ. सलमा अली
- परवीन बाबी - जैनी डिसूझा
- निरूपा रॉय - भारती त्रिपाठी
- प्राण - किशनलाल त्रिपाठी
- जीवन - रॉबर्ट डिसूझा
- कमल कपूर - सुपरईंटेंडेंट रणजीत खन्ना
- शिवराज - सलमान इलाहाबादी
- नासिर हुसेन - फादर विल्लीयम गोंजाल्विस
- युसुफ खान - जेबिस्को
- रंजीत बेदी - रंजीत आनंद
- मुकरी - तय्याब अली