निरूपा रॉय

निरूपा रॉय (गुजराती: નિરુપા રોય; ४ जानेवारी १९३१, वलसाड - १३ ऑक्टोबर २००४, मुंबई) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. दीवार, अमर अकबर अॅन्थनी, गंगा जमुना सरस्वती इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका केली होती.
पुरस्कार[संपादन]
- फिल्मफेअर पुरस्कार
- १९५६ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - मुनीमजी
- १९६२ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - छाया
- १९६५ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - शहनाई
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील निरूपा रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)