अडुळसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अडुळसा कुल Adhatoda zeylanica Medic असून शास्त्रीय नांव (Adhatoda vasaka Nees)असे आहे.

सामान्य नावे : मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका, गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी, हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.

गुणर्धम : 1.2 ते 2.8 मी.उंचीचे दाट झुडुप, फांद्या एकमेकांविरूध्द, वर जाणाऱ्या. पाने: 12-20 X 4-6 सें.मी. दीर्घवर्तुळाकार, कुंतसम. वरील पाने गर्द हिरवी खाली पांडूर.

फुले : कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत,

फळ : बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. फुल वेळ : ऑगस्ट-नोव्हेंबर.

अधिवास : बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.

स्थान : महाराष्ट्र राज्यभर कुंपणांमध्ये, दाख्खन व कोकणात विपुल.

प्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.

उपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.

गुणविशेष आणि उपयोग : मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी. झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी. कुष्ठरोग, रक्ताचा अशुध्दपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद). मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी, पाने : आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी).

स्थानिक उपयोग : मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी. पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकिेचा दाह व दमा यात गूणकारी. वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माशा, पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). या औषधाचा फुफ्फुसांवर अपाय होत नाही.

संदर्भ : महाराष्ट्र राज्य दर्शनिका संपादित ग्रंथातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.[ संदर्भ हवा ] अडुळसाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

  • संस्कृत-अटरुप
  • हिंदी-आरुखा,आडसा,वासक
  • बंगाली-
  • गुजराती-अडुरशी
  • कन्नड-आडसोने
  • मळ्यालम-
  • तामिळ- आडाडोई
  • तेलगु-आढासारं,आंडापाकु
  • इंग्रजी-
  • लॅटीन- Justicia adhatoda, (Adhatoda Vasica)

वर्णन[संपादन]

यात पांढरा व काळा अशा दोन जाति आहेत.यास पांढरी फुले येतात. झाड सुमारे २.५ ते ३ मीटर उंच वाढते.

उत्पत्तिस्थान[संपादन]

भारतात सर्व ठिकाणी.

उपयोग[संपादन]

आयुर्वेदानुसार - खोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री