Jump to content

अंजली मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anjali Kulkarni (es); অঞ্জলি মারাঠে (bn); Anjali Kulkarni (fr); Anjali Kulkarni (jv); Anjali Kulkarni (sq); Anjali Kulkarni (nl); Anjali Kulkarni (min); Anjali Kulkarni (ast); Anjali Kulkarni (ca); अंजली मराठे (mr); Anjali Kulkarni (de); Anjali Kulkarni (pt); Anjali Kulkarni (ga); અંજલિ કુલકર્ણી (gu); Anjali Kulkarni (bjn); Anjali Kulkarni (fi); Anjali Kulkarni (sl); ಅಂಜಲಿ ಮರಾಠೆ (kn); Anjali Kulkarni (pt-br); Anjali Kulkarni (gor); Anjali Kulkarni (id); Anjali Kulkarni (ace); അഞ്ജലി മറാത്തെ (ml); Anjali Kulkarni (su); Anjali Kulkarni (bug); अंजलि कुलकर्णी (hi); అంజలి మరాఠీ (te); ਅੰਜਲੀ ਮਰਾਠੇ (pa); Anjali Kulkarni (en); Anjali Kulkarni (tet); Anjali Kulkarni (map-bms); அஞ்சலி மராத்தே (ta) cantante india (es); indiai énekes (hu); ભારતીય ગાયક (gu); abeslari indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); cantante india (ast); cantant índia (ca); actores a chyfansoddwr a aned yn 1980 (cy); Indian singer (en-gb); بازیگر و خواننده هندی (fa); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); cântăreață indiană (ro); זמרת הודית (he); ureueng meujangeun asai India (ace); भारतीय गायक (hi); ভাৰতীয় কণ্ঠশিল্পী (as); Indian singer (en-ca); cantante indiana (it); ভারতীয় গায়িকা (bn); chanteuse indienne (fr); India laulja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian singer (en); cantora indiana (pt); pemeran asal India (id); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); cantante india (gl); amhránaí Indiach (ga); këngëtare indiane (sq); Indian singer (en); مغنية هندية (ar); panyanyi (mad); індійська співачка (uk)
अंजली मराठे 
Indian singer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९८०
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अंजली मराठे-कुलकर्णी (जन्म १९८०) ही एक भारतीय पार्श्वगायिका आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची गायिका आहे. मराठी चित्रपट दोघी मधील तिच्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्यासाठी तिला ओळखले जाते. बालकलाकार असताना तिच्या चित्रपट गायकी कारकिर्दीला सुरुवात झाली. तिने चित्रपटांमध्ये फारच कमी गाणी गायली आहेत परंतु ती अनेकदा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध स्टेज शोमध्ये गाणे सादर करताना दिसते.

कारकिर्द

[संपादन]

मानसशास्त्र पदवीधर असलेल्या अंजलीला वैद्यकशास्त्र करायचे होते, पण इयत्ता अकरावीत तिला कळले की तिला संगीतामध्ये रूची आहे.[]

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्यासोबत त्यांनी आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेले चौकट राजा (१९९१) चित्रपटातील "हे जीवन सुंदर आहे" हे गाणे गायले जे सुधीर मोघेंनी लिहीले होते. १९९६ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी दोघी या मराठी चित्रपटातील गाण्याच्या सादरीकरणासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने सादर केलेल्या प्रशस्तिपत्राने "आयुष्यातील रखरखीतपणा व्यक्त करणाऱ्या तिच्या मधुर आणि हृदयस्पर्शी गाण्याबद्दल" तिचे कौतुक केले.[] हा चित्रपट सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या जोडीने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता आणि त्यात रेणुका दफ्तरदार आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठे यांनी चित्रपटातील "नागपंचमीचा सण बाई" आणि "भुई भेगळली खोल" ही दोन गाणी गायली होती. चित्रपटाचे संगीत आनंद मोडक यांनी तयार केले आहे आणि गीत ना.धों. महानोर यांनी लिहिले आहे. तिला १९९६ मध्ये महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.[]

तिने साईबाबा (मराठी), मर्मबंध (मराठी) या चित्रपटांमध्ये देखील गाणे सादर केले. मर्मबंध चित्रपटामधील "उंबराच्या बनाखाली" या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - महिलासाठी झी चित्र गौरव पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. तिची आई अनुराधा मराठी आणि गायक रवींद्र साठे यांच्यासोबत तिने "जीवन त्यांना कळले हो" हे गाणे देखील रेकॉर्ड केले आहे जे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांनी लिहिले आहे आणि संगीत सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. तिने झुठे सच्चे गुड्डे बच्चे (हिंदी), ओळख सांगना (मराठी) या मालिकेसाठी शीर्षक गीते रेकॉर्ड केली. तिने ऑल इंडिया रेडिओच्या पुणे केंद्रासाठी बालोद्यान या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमात गाणी रेकॉर्ड केली. तिने अनेक स्टेज शोमध्ये भाग घेतला आहे जसे की मुंबईतील जागतिक मराठी परिषदेत झालेला "स्मरणयात्रा", नागपुर येथील "सफरनामा" (२०१९),[] पुणे येथील "शुक्रतारा" (२०२३).[] अंजली या कार्यक्रमांव्यतिरिक्त वक्तृत्व, नृत्य, नाटक आणि पथनाट्यातही भाग घेते.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

अंजलीने तिची आई अनुराधा मराठे यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले जी स्वतः एक प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहे आणि मराठी तसेच हिंदी गाण्याचे कार्यक्रम करतात.[]

अंजलीचे लग्न गायक-संगीतकार सलील कुलकर्णीशी झाले होते. त्यांना दोन मुले आहेत - मुलगा शुभंकर ज्याने लहान मुलांच्या चिंटू (२०१२) चित्रपटासाठी गाणे गायले आहे आणि मुलगी अनन्या. पण २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मुलांचा ताबा त्यांचे वडील सलील कुलकर्णी यांच्याकडे होता. २०२१-२२ मध्ये विविध मुलाखतींमध्ये, सलीलने त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दलच्या सर्व अफवा नाकारल्या.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "In the genes" Archived 2005-05-01 at the Wayback Machine.. The Indian Express. 20 April 2005. Retrieved 1 June 2011.
  2. ^ "43rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 16 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 3 September 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Cinemas of India".
  4. ^ Shreya Tinkhede (Sep 16, 2019). "Majumdar strikes a silver chord with 25 years in music industry". times of india.
  5. ^ "Pune: Musical program 'Shukratara' on May 11". ४ मे २०२३.
  6. ^ Rashmi Kumar (April 20, 2005). "In the genes". Indian Express (Pune). रोजी मूळ पानापासून संग्रहित2005-05-01. 2024-03-26 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  7. ^ गायत्री हसबनीस (३ नोव्हेंबर २०२३). "'दोन मुलांना एकटा बाप कसा वाढवणार?' घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींना ऐकावे लागले होते टोमणे". zee news.