सिकंदर बख्त
Appearance
सिकंदर बख्त (२४ ऑगस्ट १९१८ - २३ फेब्रुवारी २००४) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व १९९६ साली अत्यंत अल्प काळाकरिता अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. १९७७ साली दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर तर १९९० साली मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले.
इ.स. २००० साली त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला. २००२ ते मृत्यूपर्यंत त्यांनी केरळ राज्याच्या राज्यपालपदाचा भार संभाळला.