Jump to content

लंडन सिटी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लंडन सिटी विमानतळ
चित्र:London City Airport logo.svg
आहसंवि: LCYआप्रविको: EGLC
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक कुवैत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि ऑन्टॅरियो टीचर्स पेन्शन प्लान सह ३ इतर कंपन्या
प्रचालक लंडन सिटी एरपोर्ट लिमिटेड
कोण्या शहरास सेवा लंडन महानगर आणि केंट
स्थळ रॉयल डॉक्स, न्यूहॅम, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
समुद्रसपाटीपासून उंची 19 फू / 6 मी
गुणक (भौगोलिक) 51°30′19″N 000°03′19″E / 51.50528°N 0.05528°E / 51.50528; 0.05528गुणक: 51°30′19″N 000°03′19″E / 51.50528°N 0.05528°E / 51.50528; 0.05528
संकेतस्थळ www.londoncityairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०९/२७ १,५०८ ४,९४८ डांबरी
सांख्यिकी (२०२२)
प्रवासी ३०,०९,३१३
प्रवासी बदल (२१-२२) ३१८%[]
विमानोड्डाणे ४४,७३१
बदल (२१-२२) २४६%[]
स्रोत: यूके एआयपी, नॅट्स[] WAD[]


सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (यूके)[]

लंडन सिटी विमानतळ (आहसंवि: LCYआप्रविको: EGLC) हा इंग्लंड आणि युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन शहरातील सहापैकी एक विमानतळ आहे. न्यूहॅमच्या बरो मधील रॉयल डॉक्स भागातील हा विमानतळ लंडन शहराच्या पूर्वेस अंदाजे ६ मैल (९.७ किमी) आणि कॅनरी व्हार्फच्या पूर्वेस ३ मैल (४.८ किमी) अंतरावर आहे. लंडनच्या आर्थिक उद्योगाच्या या दुहेरी केंद्रांतून लंडन सिटी विमानतळातील बव्हंश प्रवासी ये-जा करतात. हा विमानतळ १९८६-८७ विकसित केला. २०१६मध्ये कुवैत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, ऑन्टॅरियो टीचर्स पेन्शन प्लान आणि इतर कंपन्यांनी हा विमानतळ विकत घेतला. []

लंडन सिटी विमानतळाला एकच १,५०८ मीटर (४,९४८ फूट) लांबीची धावपट्टी आहे. येथे व्यावसायिक उड्डाणांशिवाय फक्त या विमानतळावर विमाने उतरवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अव्यावसायिक उड्डाणे होऊ शकतात.[] हा विमानतळ शहरमध्यावर असल्याने व आखूड धावपट्टी असल्याने येथे उतरण्यासाठी विमानांना ५.५° अंशाने किंवा अधिक तीव्र उतार घेउन उतरता येते. यामुळे येथे फक्त एम्ब्राएर ई-१९५-ई२, एरबस ए२२०[] आणि ए३१८[] प्रकारच्या विमानांना ये-जा करण्यास परवानगी आहे. या विमानाचा विस्तार सुमारे ६० हेक्टर (१५० एकर) आहे. []

२०१९ साली या विमानतळावरुन ५१ लाख पेक्षा अधिक प्रवाशांनी ये-जा केली होती.[] हीथ्रो, गॅटविक, स्टॅनस्टेड आणि लुटॉन नंतर हा विमानतळ सर्वाधिक व्यस्त आहे तर यूकेमधील १४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ होता.

लंडन सिटी एरवेझचे डी हॅविलँड कॅनडा डॅश ७ प्रकारचे विमान ॲमस्टरडॅमला जाण्याच्या तयारीत असताना पश्चिमेकडून तीव्र उतार घेत उतरणारे याच प्रकारचे अजून एक विमान
टर्मिनल इमारत
टर्मिनलच्या आतील भाग
पार्श्वभूमीत कॅनरी वार्फ असलेले रात्रीचे विमानतळाचे दृश्य

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

खालील विमान कंपन्या लंडन सिटी विमानतळावर आणि येथून नियमित सेवा चालवतात: [१०]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर डोलोमिटी Frankfurt[११]
ऑरिन्यी Guernsey[१२]
ब्रिटिश एरवेझ Amsterdam, Barcelona, Belfast–City, Berlin, Billund,[१३] Dublin, Edinburgh, Florence, Frankfurt, Glasgow, Ibiza, Málaga, Palma de Mallorca, Rotterdam/The Hague, San Sebastián, Zürich
Seasonal: Bergerac, Chambéry, Faro, Geneva, Milan–Linate,[१४][१५] Mykonos, Nice, Prague, Skiathos, Split, Thessaloniki
आयटीए एरवेझ Milan–Linate, Rome–Fiumicino[१६]
केएलएम Amsterdam
Loganair Isle of Man
लॉट पोलिश एरलाइन्स Vilnius
लुफ्तांसा Frankfurt[१७]
लुक्सेर Luxembourg
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स Zürich
मोसमी: Geneva

मार्ग

[संपादन]
लंडन सिटी (२०२२) पासून आणि जाण्यासाठी सर्वात व्यस्त मार्ग [१८]
क्र विमानतळ एकूण
प्रवासी
बदल
२०२०-२१
ॲमस्टरडॅम ३९३,७४८ increase 381.6%
2 एडिनबर्ग ३०४,०३५ increase</img> २३४.३%
3 झुरिच २९३,८२२ increase</img> ४९५.८%
4 फ्रँकफर्ट 226,711 increase</img> ४७१.९%
डब्लिन २०६,९४५ increase</img> २८७.२%
6 लक्झेंबर्ग १८१,६७० increase</img> ६६९.९%
ग्लासगो १७६,७६३ increase</img> 204.1%
8 बर्लिन १३६,२८१ increase</img> 428.8%
बेलफास्ट-शहर १२१,५०२ increase</img> ६१.४%
10 डसेलडॉर्फ ११८,९९७ increase</img> ४३१.६%

वाहतूक

[संपादन]

डॉकलँड्स लाइट रेल्वे

[संपादन]
लंडन सिटी विमानतळ DLR स्टेशन (2006)

लंडन सिटी विमानतळ डीएलआर स्थानक या विमानतळाला शहराशी रेल्वेमार्गे जोडते. हे स्थानक टर्मिनल इमारतीला लागून आहे. येथून कॅनरी वार्फ आणि लंडन शहर तसेच स्ट्रॅटफर्ड इंटरनॅशनल डीएलआर स्थानक आणि वूलविच आर्सेनल डीएलआर स्थानकांना आणि लंडन अंडरग्राउंड, लंडन ओव्हरग्राउंड, एलिझाबेथ लाइन, ग्रेटर अँग्लियाला थेम्सलिंक आणि दक्षिणपूर्व जलदगती रेल्वेसेवाला जाता येते.[१९]

स्थानिक बस

[संपादन]

लंडन सिटी विमानतळाला लंडन बसचे खालील मार्ग सेवा देतात:

  • ४७३ - प्लेनस्टो आणि नॉर्थ वूलविच मार्गे
  • ४७४ - ते कॅनिंग टाउन आणि मनोर पार्क मार्गे बेकटन आणि ईस्ट हॅम

रिव्हरबोट

[संपादन]

येथील रॉयल व्हार्फ धक्क्यावरुन थेम्स क्लिपर्स द्वारे मध्य लंडनपर्यंत प्रवास करता येतो. [२०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Annual airport data 2022 | Civil Aviation Authority". www.caa.co.uk.
  2. ^ "London/City – EGLC". Nats-uk.ead-it.com. 27 May 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "CITY". World Aero Data. WorldAeroData.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2 March 2020. 2 March 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  4. ^ "London City Airport bought for £2bn by Canadian-led group". BBC News. 26 February 2016. 28 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "The UK Integrated Aeronautical Information Package (IAIP) – London/City (EGLC)". Nats-uk.ead-it.com. 27 May 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 August 2013 रोजी पाहिले.
  6. ^ New generation aircraft London City Airport
  7. ^ Wallsworth, Dave (7 November 2017). "Airbus A318 at London City Airport". Captain Dave (इंग्रजी भाषेत). 13 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-12 रोजी पाहिले.
  8. ^ London City Airport master plan 2020 (Report). 4 December 2020. p. 17. |access-date= requires |url= (सहाय्य)
  9. ^ Discover the data behind LCY London City Airport
  10. ^ [१] retrieved 5 October 2024
  11. ^ "Lufthansa/Air Dolomiti NS24 European network/frequency changes – 21Jan24". 22 January 2024. 22 January 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Flights to London City relaunched by Aurigny". BBC News. 22 February 2024.
  13. ^ "British Airways Relaunches London City – Billund". London Air Travel. 7 July 2022. 7 July 2022 रोजी पाहिले.
  14. ^ "British Airways - Information Page".
  15. ^ "UK NW23 Network Additions/Removals Summary – 29OCT23".
  16. ^ "ITA Airways aprira' Londra City non stop anche da Roma". 11 December 2023.
  17. ^ "Air Dolomiti Expands Lufthansa Codeshare in NW24".
  18. ^ "Annual airport data 2021". UK Civil Aviation Authority. 21 March 2023. Tables 12.1 (CSV) and 12.2 (CSV). 25 March 2023 रोजी पाहिले.
  19. ^ Simons, Graham; Bowman, Martin W. (2011). London's Airports (इंग्रजी भाषेत). Casemate Publishers. p. 132. ISBN 9781848843943. 19 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 September 2018 रोजी पाहिले.
  20. ^ "Work begins on new riverboat stop near London City Airport". 12 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2019 रोजी पाहिले.