Jump to content

कॅनेरी व्हार्फ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनरी व्हार्फ हा इंग्लंडच्या लंडन शहरातील एक भाग आहे, टॉवर हॅमलेट्स या लंडनच्या बरोमध्ये आईल ऑफ डॉग्स जवळ असलेल्या कॅनरी व्हार्फचा समावेश ग्रेटर लंडन प्राधिकरणाने मध्य लंडन मध्ये केला आहे. [] कॅनेरी व्हार्फ हा लंडन शहर हे युनायटेड किंग्डम आणि जगातील मुख्य आर्थिक केंद्रांपैकी एक आहे, [] येथे अनेक गगनचुंबी इमारती आहेत. येथील वन कॅनड स्क्वेर ही इमारत यूकेमधी तिसऱ्या क्रमांकाची उंच इमारत आहे. [] []

लंडनच्या पूर्व भागातील वेस्ट इंडिया डॉक्सच्या जागेवर विकसित केलेल्या कॅनरी व्हार्फमध्ये सुमारे १ कोटी ६० लाख चौरस फूट (१५ लाख चौरस मीटर) इतकी कार्यालय आणि दुकानांची जागा उपलब्ध आहे. यात कॅनडा स्क्वेर, कॅबोट स्क्वेर, वेस्टफेरी सर्कस, ज्युबिली पार्क आणि क्रॉसरेल प्लेस रूफ गार्डन यासह अनेक मोकळ्या सोडलेल्या जागा आणि उद्याने आहेत.

१८९९ मध्ये कॅनरी व्हार्फ, वेस्ट इंडिया डॉक्स आणि आईल ऑफ डॉग्सचा नकाशा
कॅबोट स्क्वेृरपासूनचे पूर्वेकडचे दृश्य

वाहतूक

[संपादन]

कॅनेरी व्हार्फ लंडन शहर तसेच प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवां द्वारे जोडलेलेआहे.

रेल्वे

[संपादन]

कॅनेरी व्हार्फ लंडनच्या भाडे क्षेत्र २ मध्ये आहे. या भागात अनेक स्थानके आहेत.

ज्युबिली लाइनवर कॅनेरी व्हार्फ ट्यूब स्टेशन

बस सेवा

[संपादन]

लंडन बस मार्ग १३५, २७७, डी३, डी७, डी८, एन२७७ आणि एन५०० कॅनेरी व्हार्फ भागातील स्थानकांना सेवा देतात. १३५ मार्ग कॅनेरी व्हार्फला थेट लंडन शहरी व्हा रातील लिव्हरपूल स्ट्रीट तर डी८ मार्ग ला स्ट्रॅटफोर्डला जोडतात. []

रिव्हरबोट

[संपादन]

कॅनेरी व्हार्फ धक्क्यावर रिव्हरबोट सेवा उपलब्ध आहेत.

विमानतळ

[संपादन]

लंडन सिटी विमानतळ येथून ३ मैल (४.८ किमी) अंतरावर आहे. २०१८मध्ये या विमातळावरून ४८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. येथून न्यू यॉर्कसह अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थाने आणि देशातील बव्हंश ठिकाणी सेवा उपलब्ध आहे. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Greater London Authority 2008.
  2. ^ "United Kingdom Skyscraper Diagram". skyscraperpage.com. 20 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 August 2021 रोजी पाहिले.
  3. ^ A. Beaumont (2015). Contemporary British Fiction and the Cultural Politics of Disenfranchisement: Freedom and the City (illustrated ed.). Springer. p. 40. ISBN 9781137393722.
  4. ^ "Buses from Canary Wharf" (PDF). Transport for London (TfL). 28 May 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  5. ^ "Passenger numbers at London City Airport up by 6.4 per cent in 2018". International Airport Review. 9 January 2019. 28 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Destinations". London City Airport. 26 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.