Jump to content

रानगवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रानगवा
बंदीपूर राष्ट्रीय उद्यानातील एक नर गवा
मादी गवा आणि तिचे पिल्लू
मादी गवा आणि तिचे पिल्लू
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बोस
जीव: गॉरस
शास्त्रीय नाव
बोस गॉरस
एच. स्मिथ, १८२७
आढळप्रदेश
आढळप्रदेश

रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेशआग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडाजिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.[]

पूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो. सहसा रानगवे जंगलात कळप करून रहातात. रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो.[].[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Duckworth, J. W.; Sankar, K.; Williams, A. C.; Samba Kumar, N.; Timmins, R. J. (2016). Bos gaurus. p. e.T2891A46363646. 14 January 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "रानगवा: 1000 किलोपर्यंत वजन मात्र लाजाळू प्राणी आणि खातो गवत". २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "कास पठार परिसरात दुर्मिळ रानगवे, पर्यटकांची पर्वणी". २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.