बायसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बायसन
Bison
2–0 Ma
Early Pleistocene– Present
अमेरिकन बायसन (Bison bison)
अमेरिकन बायसन (Bison bison)
युरोपियन बायसन(Bison bonasus)
युरोपियन बायसन(Bison bonasus)
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: शाकाहारी
गण: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बायसन
शास्त्रीय नाव
बायसन बायसन
हैमिल्टन, १८२७
बायसन बोनासस
इतर प्रजाती

B. bison
B. bonasus
B. antiquus
B. latifrons
B. occidentalis
B. priscus
† = लुप्त झालेल्या प्रजाती

बायसन (Bison) हा एक शाकाहारी सस्तन खुरधारी जंगली प्राणी आहे. हा बहुतांश यूरोपीय देश आणि अमेरिका खंडात आढळतो. बायसन मध्ये माहिती असलेल्या सहा प्रजाती आहेत. पैकी दोन प्रजाती अस्तित्वात असून चार प्रजाती लुप्त झाल्यात.[१]

अमेरिकन बायसन (bison bison) हा उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आढळतो. तिथे याचे अजून दोन उपप्रकार आढळतात, प्लेन बायसन आणि वूड बायसन. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. तेव्हापासून ते आजतागायत कॅनडा आणि अमेरिकेत बायसन चे बफेलो हे नाव कायम झाले.[२][३] विशेष म्हणजे मूळ म्हैस आणि बायसन पशु यांचा संकर घडवून झुब्रॉन आणि बैल व बायसन यांचा संकर घडवून बिफॅलो आशा दोन नवीन जीवांची पैदास करण्यात आली.

झुब्रॉन
बिफॅलो

युरोपियन बायसन (bison bonasus) ही बायसन ची दुसरी प्रजाती युरोप आणि कॉकेशस मध्ये आढळते. ही युरोपियन प्रजाती लुप्त होण्यापासून महत्प्रयासाने वाचवण्यात आली.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Brink, Jack W. (2008). Imagining Head-Smashed-In: Aboriginal Buffalo Hunting on the Northern Plains Archived १६ डिसेंबर २०११, at the Wayback Machine. (PDF). Athabasca University Press. ISBN 978-1-897425-09-1.
  2. ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Olson, Wes. "Bison". The Canadian Encyclopedia. Archived from the original on 17 March 2014. २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "The European bison is no longer a vulnerable species" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.