Jump to content

चंदू चँपियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदू चँपियन
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट
कथा कबीर खान
प्रमुख कलाकार  • कार्तिक आर्यन,
 • विजय राज,
 • भुवन अरोरा,
 • ईतर
छाया सुदीप चॅटर्जी, आय पी सिंग, कौसर मुनीर
गीते अमिताभ भट्टाचार्य
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ जून २०२४
अवधी १४२ मिनिटे
निर्मिती खर्च १३० कोटी


चंदू चँपियन हा २०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक क्रीडापट आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत साजिद नाडियादवाला याचे निर्माते आहेत. हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित असून मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन आहे.[][]

या चित्रपटाचे प्रमूख चित्रीकरण जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत लंडन, वाई आणि जम्मू आणि काश्मीर येथे झाले आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.[]

प्रमूख कलाकार

[संपादन]
  • कार्तिक आर्यन - मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत.
    • अयान खान स्रोहा - तरुण मुरलीकांतच्या भूमिकेत
  • विजय राज - टायगर अलीच्या भूमिकेत
  • भुवन अरोरा - गर्नेल सिंगच्या भूमिकेत आहे
  • यशपाल शर्मा - उत्तम सिंगच्या भूमिकेत
  • राजपाल यादव - पुष्कराजच्या भूमिकेत
  • अनिरुद्ध दवे - जगन्नाथ राजाराम पेटकरच्या भूमिकेत अनिरुद्ध दवे
  • श्रेयस तळपदे, निरीक्षक सचिन कांबळेच्या भूमिकेत (विशेष उपस्थिती)
  • गणेश यादव - गणपत काकांच्या भूमिकेत
  • भाग्यश्री बोरसे - नयनताराच्या भूमिकेत (विशेष उपस्थिती)[]
  • सोनाली कुलकर्णी - पत्रकार
  • हेमंत चौधरी - ब्रिगेडियर
  • बृजेंद्र काला - पोलिस ठाण्यातील चोर
  • ॲडोनिस कपसालिस - कार्लोस पेड्रोझाच्या भूमिकेत
  • हेमांगी कवी - मुरलीकांतच्या आईच्या भूमिकेत

निर्मिती

[संपादन]

कबीर खानने पहिल्यांदा जुलै २०२२ मध्ये चित्रपटाची घोषणा केली.[] कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनीत असलेल्या साजिद नाडियादवाला यांनी ४ जुलै २०२३ रोजी मोशन पोस्टरसह चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.[][]

हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[]

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे, तर गीते अमिताभ भट्टाचार्य, आयपी सिंग आणि कौसर मुनीर यांनी लिहिली आहेत. चित्रपटात एकूण सात गाणी असून या गाण्यांना, अरिजित सिंह, नकश अझीझ, देव नेगी, अमित मिश्रा, श्रीराम चंद्र, मामे खान, कैलास वाघमारे, दर्शन रावल, शान आणि मोहम्मद इरफान आपला आवाज दिला. यातील "सत्यानास" नावाचे पहिले एकल गीत २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित झाले.[] दुसरे एकल गीत "तू है चॅम्पियन" ३० मे २०२४ रोजी प्रदर्शित झाले.[] तर "सरफिरा" नावाचे तिसरे एकल ८ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kartik Aaryan completes shooting of Kabir Khan's 'Chandu Champion'". The Hindu (इंग्रजी भाषेत). 1 February 2024. ISSN 0971-751X. 12 February 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Kartik Aaryan's astonishing transformation for 'Chandu Champion' leaves Arjuna Awardee Virdhawal Khade in awe". द टाइम्स ऑफ इंडिया. 31 January 2024. ISSN 0971-8257. 12 February 2024 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Chandu Champion: Kartik Aaryan films 8-minute-long single-shot war sequence". Deccan Herald. 12 October 2023. 9 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "REVEALED: Meet Bhagyashri Borse, the mystery girl who features in Kartik Aaryan-starrer Chandu Champion". Bollywood Hungama. 25 May 2024. 25 May 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Kabir Khan announces next film with Kartik Aaryan, says actor will be in a completely new avatar". इंडियन एक्सप्रेस. 18 July 2023. 9 January 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Kartik Aaryan-Kabir Khan's film titled 'Chandu Champion', to release in June 2024". द हिंदू. 4 July 2023. 9 January 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Chandu Champion: Kartik Aaryan announces title and release date of film with Kabir Khan, Sajid Nadiadwala". हिंदुस्तान टाइम्स. 4 July 2023. 9 January 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Chandu Champion Song Satyanaas: Kartik Aaryan Dances Like Nobody Is Watching". NDTV. 24 May 2024. 25 May 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Chandu Champion song Tu Champion Hai: Kartik Aaryan turns trials into triumph in Arijit Singh's inspiring song". The Indian Express. 30 May 2024. 1 June 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]