मुरलीकांत पेटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुरलीकांत पेटकर
मुरलीकांत पेटकर
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
संकेतस्थळ
www.murlikantpetkar.com

मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत.जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या ग्रीष्म पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.[१] त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला.[२] त्याच खेळांमध्ये त्याने भाला, अचूक भालाफेक आणि ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला. तिन्ही स्पर्धांमध्ये ते अंतिम स्पर्धक म्हणून होते. २०१८ मध्ये, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३][४]

जीवनचरित्र[संपादन]

मुरलीकांत पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील सांगलीच्या पेठ-इस्लामपूर भागात झाला. पेटकरांनी शालेय जीवनातच कुस्ती, हॉकी ,हॉकी आणि मैदानी खेळात चमक दाखवून आपले खेळाविषयीचे प्रेम निदर्शनास आणले होते.पुणे येथे भारतीय सैन्यदलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली.प्रत्येक खेळात प्राविण्य मिळवले.

१९६४ साली जपानमधील तोक्यो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्यदलातर्फे मुष्टियुद्ध या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.

१९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धाच्या वेळी ते गंभीरपणे जखमी झाले होते.[५]

मुरलीकांत पेटकर यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीत यांनी अनेकविध आंतरराष्ट्रीय  स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला बहुमान प्राप्त करून दिला आहे. इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मंन्डेविले आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजीक स्पर्धेमध्ये स्वतःचेच विक्रम मोडला.[६] सलग ५ वर्षे (१९६९-७३) सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवण्याचे सातत्य, स्कॉटलंडमधील एडिनबरा येथे झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजीक  स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रीस्टाईल पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेकीत कांस्य; तसेच १९८२ साली हॉंगकॉंग येथे आंतरराष्ट्रीय FESPIC क्रीडास्पर्धेत त्यांनी ५० मी. जलतरण स्पर्धेत केलेला एक नवीन विश्वविक्रम.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Murlikant Petkar". murlikantpetkar.com. 2019-09-23 रोजी पाहिले.
  2. ^ "45 years after winning India's first Paralympics gold, Petkar gets Padma Shri - Times of India". The Times of India. 2019-09-23 रोजी पाहिले.
  3. ^ DelhiJanuary 25, India Today Web Desk New; January 25, 2018UPDATED:; Ist, 2018 20:47. "1972 Paralympic gold medallist Murlikant Petkar receives Padma Shree 2017". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-09-23 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ Thorpe, Thorpe and. General Studies: Vol-1 GK & CA 2019 (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 978-93-5343-133-4.
  5. ^ "From war-hit holiday to Paralympics gold, Petkar lives dramatic tale - Times of India". The Times of India. 2020-03-28 रोजी पाहिले.
  6. ^ "Amalraj gets top slot, Sharath seeded No. 15 in senior national Table Tennis - Times of India". The Times of India. 2019-12-01 रोजी पाहिले.