Jump to content

बाणगंगा नदी (सातारा जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाणगंगा नावाची एक नदी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण शहरातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या अलीकडे फलटण आणि पलीकडे मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी ओढ्याप्रमाणे असते. ही नदी फलटण तालुक्याची जीवनदायिनी आहे. या नदीवर बाणगंगा नावाचे धरण बांधण्यात आले आहे. धरणानंतरही नदीचा प्रवाह त्याच नावाने चालू राहतो.

Banganga river near phaltan

शंभू महादेव डोंगर रांगेतील श्रीक्षेत्र सीताबाई देवस्थान दंडकारण्य, कुळकजाई (ता.माण जि.सातारा) येथे ही नदी उगम पावते

शूरवीरांचा_जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या उत्तर सरहद्दीवर शंभुमहादेवाच्या डोंगररांगेतील उंच कड्यावर पौराणिक दंडकारण्यातील श्री सीतामाईचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूस बाणगंगा नदीचे उगमस्थान आहे. ते कुंड सध्या बंदिस्त करण्यात आहे.

बाणगंगा व माणगंगा या दोन्ही नद्यांचे उगमस्थान एकमेकांपासुन १००-१२५ फुटांवर आहे.

माणगंगाबाणगंगा नदीच्‍या उगमाबद्दल जनलोकांत अनेक आख्‍यायिका आहेत. 

माणदेश पुराणकाळी काळी दंडकारण्‍यात होता. रावणवधानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. यानंतर थोड्याच अवधीत गरोदर सीतामातेचा श्रीरामांनी त्याग केला तिला पुन्हा वनवास आला. त्यासाठी लक्ष्मण सीतामाईला दंडकारण्यातील या डोंगरावर सोडण्यासाठी आले तिथे थकल्‍यामुळे सीतामाईला तहान लागली. पण त्‍या ओसाड डोंगराळी माळरानाच्‍या भागात पाणी कोठून मिळणार? अखेर, लक्ष्मणाने बाण मारून पाणी काढले. ज्‍या ठिकाणी बाण मारला,त्‍या ठिकाणातून प्रवाह वाहू लागला. त्‍या प्रवाहातून लक्ष्मणाने द्रोण भरून पाणी घेतले आणि तो तहानलेल्‍या सीतामाईकडे आला. परंतु तोपर्यंत तहानेने सीतेला ग्लानी आली होती. ‘झोपलेल्‍या माईं’ना कसे उठवावे म्हणून लक्ष्मणाने त्‍यांना उठताच दिसेल अशा मानेपासून हातभर अंतरावर पाण्‍याने भरलेला द्रोण ठेवला. सीतामार्इंना काही वेळाने जाग आली. त्‍या उठू लागताच मानेचा धक्का द्रोणाला लागला आणि पाणी सांडले - प्रवाह वाहू लागला. तेव्हापासून लक्ष्मणाने बाण मारलेल्‍या प्रवाहास " बाणगंगा " आणि सीतामार्इंच्‍या मानेचा धक्का लागून द्रोणातील सांडलेल्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहास " माणगंगा " असे नाव पडले. ज्‍या ठिकाणी तो प्रसंग घडला त्‍या डोंगराला " सीताबाईचा डोंगर " असे नाव दिले गेले आहे. श्रीक्षेत्र सीताबाई येथुन उगम पावणारी बाणगंगा उत्तरेकडे वेळोशी, उपळवे, मांडवखडक, फलटण शहरातून वाहत जाऊन कांबळेश्वर व सोमंथळी गावांच्या दरम्यान निरा नदीला मिळते.

2019चा पावसाळ्यामध्ये या नदीला प्रचंड महापूर आला होता चौदा वर्षातून पहिल्यांदाच या नदीला पूर आला होता फलटण शहराच्या नागरिकांमध्ये तेव्हा आनंदाचं वातावरण होतं नदीची लांबी - ३३ किलोमीटर.

नदीचा संगम -फलटण तालुक्यातल्या कांबळेश्वर व सोमंथळी येथे नीरा नदीशी होतो. जुलै 2019 व सप्टेंबर 2019 मध्ये बानगंगा नदीला महापूर आला होता तेव्हा निम्मे फलटण शहर हे पाण्यामध्ये होते बाणगंगा नदी फलटण तालुक्यासाठी जीवनदायी आहे बाणगंगा नदी शिखरे तर सहाच महिने वाहिनी नदी होती मात्र जुलै 2019 ते मार्च 2020 पर्यंत ही नदी वाहत होती