मलठण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मलठण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिरूर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 412218
• एमएच/12

मलठण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.या गावाचे स्थान हे मध्यवर्ती आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

लोक जीवन सर्वसामान्य आहे अनेक जाती धर्माचे लोक गावात रहात आहेत इतिहासिक 300 वर्षांपेक्षा जुने प्राचीन मल्लिकार्जुन शिव मंदिर आहे,खाजगी हॉस्पिटल सोबतच नवीन शासकीय हॉस्पिटल उभारले आहे, शिक्षणिक संस्था आहेत,उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. येथे शेती हा मुख्य व्यवसाय असून त्यावर आधारित जोडधंदे यांचा विकास झाला आहे. गावाजवळच साखर कारखाना , दूध प्रक्रिया उद्योग असून त्यामुळे देशातून अनेक कामगार इथे स्थलंतरित झाले आहेत.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

सरदार श्रीमंत धैरशीलराजे पवार घराण्याचा सुंदर सुस्थितीत राजवाडा आहे. मध्य भागी असलेला भाग युद्ध मध्ये शत्रूकडून जाळला असल्याचे सांगितले जाते. राजवाड्यात सुंदर वैभवशाली छोटे मंदिर आहे, राजड्यात विहीर आहे. विहिरीमध्ये बारा दरवाजे कमानीयुक्त आहे. कोल्हापूर येथील नवीन राजवाडा येथे मलठण येथील पवार घराण्याची वंशावळ पहायला मिळते. महाशिवरात्री ला दोन दिवस मोठी यात्रा भरते.या गावाच्या पश्चिमेस आणि पूर्वेस छोटी मोठी तलाव आहेत. गाव शैक्षणिक दृष्टया प्रगत असून स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यांच्या इमारती देखील सुंदर आहेत . गावाच्या चहूबाजूने छोट्या टेकड्या असून त्या पावसाळ्यात हिरवळीने सुंदर दिसतात

नागरी सुविधा[संपादन]

राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध आहेत, पाणी पुरवठा आहे, बँक आहे, प्राथमिक शाळा,महाविद्यालय आहे, हॉस्पिटल आहे,नळ पाणी पुरवठा आहे, या गावातून शिक्षण घेतलेले अनेक उच्च पदस्थ अधिकारी देश सेवा करत आहेत, भारतीय लष्कर,पोलिस, राज्यसेवा आयोग, शैक्षणिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक प्रसिद्ध डॉक्टर या गावाने तालुक्यासाठी दिले आहेत.या गावातून क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक खेळाडूंनी नाव मिळवले आहे.

जवळपासची गावे[संपादन]

लाखेवादी,वाघाळे,शिंगाडवाडी,चिंचोली मोराची,शास्थाबाद,फलंकेवाडी,कवठे येमाई, आमदाबाद,निमगाव भोगी,सोनेसांगवी,

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate