Jump to content

कोट्टायम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोट्टयम
കോട്ടയം
भारतामधील शहर


कोट्टयम is located in केरळ
कोट्टयम
कोट्टयम
कोट्टयमचे केरळमधील स्थान

गुणक: 9°35′24″N 76°31′30″E / 9.59000°N 76.52500°E / 9.59000; 76.52500

देश भारत ध्वज भारत
राज्य केरळ
जिल्हा कोट्टायम जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९२४
क्षेत्रफळ ५५.२ चौ. किमी (२१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १५७ फूट (४८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५५,३७४[]
  - घनता १,००० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल)
  - महानगर ३,५७,३०२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कोट्टयम (मल्याळम: കോട്ടയം) हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील कोट्टयम जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख शहर आहे. कोट्टयम शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १४७ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६० किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली कोट्टयमची लोकसंख्या सुमारे ५५ हजार होती ज्यापैकी ३९ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय होते. साक्षरतेच्या बाबतीत कोट्टयमचा केरळमध्ये पहिला तर भारत देशात चौथा क्रमांक लागतो व येथील ९७.१ टक्के लोकसंख्या साक्षर आहे.

कोट्टयम हे दक्षिण रेल्वेचे केरळमधील एक वर्दळीचे स्थानक असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी गाड्या सुटतात. हिमसागर एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Kottayam Population Census 2011". 17 Nov 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]