रिसोड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?रिसोड

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: ऋषिवट
—  तालुका  —
Map

१९° ५८′ १२″ N, ७६° ४६′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
अमितभाऊ झनक
तहसील रिसोड
पंचायत समिती रिसोड
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 444506
• +०७२५१

 रिसोड[संपादन]

रिसोड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

आगरवाडी आंचळ आसेगावपेण आसोळा (रिसोड) बाळखेड बेळखेडा भापूर भारजहागिर भोकरखेड बिबखेड बोरखेडी चाकोळी चिंचांबापेण चिंचबाभर चिखली (रिसोड) दापुरीखुर्द (रिसोड) देगाव (रिसोड) देऊळगावबांदा धोडपबुद्रुक धोडपखुर्द एकळासपूर (रिसोड) गणेशपूर (रिसोड) गौंधाळा घोणसरवाडी घोटा (रिसोड) गोभाणी गोहागाव गोवर्धन हरळ (रिसोड) हिवरपेण जायखेड जांबआढाव जावळा (रिसोड) जोगेश्वरी (रिसोड) कळमगव्हाण कान्हेरी (रिसोड) कणकारवाडी करंजी (रिसोड) करडा कवठाखुर्द केणवाड केशवनगर (रिसोड) खडकीधांगरे खडकीसदर किणखेड (रिसोड) कोयळीबुद्रुक कोयळीखुर्द कुकसा कुरहा लेहाणी लिंगाकोतवाल लोणीबुद्रुक लोणीखुर्द माहागाव मांडवा (रिसोड) मांगरूळझनक मांगवाडी मासळापेण मोहजाइंगोळे मोहजाबांदी मोप मोरगव्हाण (रिसोड) मोठेगाव नागझरी (रिसोड) नांधाणा नावळी नेर (रिसोड) नेतनासा निजामपुर पाचांबा पळसखेड पंतपूर पारडीतिखे पातवड पेडगाव (रिसोड) पेणबोरी पिंपरखेड पिंपरीसरहद रिथाड सारापखेड सावड शेळगावराजगुरे शेळुखडसे तांदुळवाडी (रिसोड) तपोवन (रिसोड) उकिरखेड व्याद वाडी रायतळ वाडीवाकड वाडजी वाघीखुर्द वाकड वाणोजा (रिसोड) वरुडतोहफा येवटा (रिसोड) येवटी

इतिहास[संपादन]

रिसोड हे एक पौराणिक गाव/शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. असे म्हणतात की रिसोड परिसरात पुराणकाळी असंख्य वडाची झाडे होती.तिथे ऋषिमुनी तपस्या करीत असत. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमि म्हणुन रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. या ठिकाणी अनेक महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. रंगारी लोकांचे शहर म्हणूनसुद्धा रिसोडची ख्याती होती. रिसोड हे तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्करे आपले तळ ठोकून असत. १७२४ साली येथील रहिवाशांनी हे तलाव नष्ट केले. तरीहि आजतयागत पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे. रिसोड क्षेत्र लखूजी जाधवांना मिळाल्यावर काझीखानाने रिसोडवर मोठा दरोडा घालून हा परगणा लुटला होता. १८५७ च्या दरम्यान पेंढारे व रोहिल्यांनीही रिसोडवर दरोडे घातले होते. मात्र त्यांना रहिवाशांनी एकत्रितपणे हुसकावोपोन लावल्याचे उल्लेख आहेत. १९२८ सालच्या (वर्ग ८ ते १०) इंग्रजी शासनाच्या भूगोलाच्या पुस्तकात रंगारी लोकांचे गाव असे रिसोडचे वर्णन आहे असे १९२८ साली इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेल्या एका दिवंगत व्यक्तीने काही शिक्षकांना सांगितले होते.

विदर्भ प्रांतातील हा तालुका मराठवाड्याच्या सीमेस लागून आहे.

महत्त्वाचे म्हणजे रिसोडला कापसाची व अन्य कृषिउत्पादनांची अधिकृत बाजारपेठ (Agri and Cotton Market Committee) १८९९ साली स्थापन झाली होती.

रिसोडचे ग्राम दैवत सिद्धेश्वर मंदिर[संपादन]

सिद्धेश्वर मंदिर म्हणजे रिसोड शहराचे ग्रामदैवत असून ते अतिशय प्राचीन मानल्या जाते. तसेच नेतंसा येथील गणपती हे अतिशय प्रसिद्ध आहे येथील मुर्ती ही उजव्या सोंडेची असून मन मोहिनी आहे. व राज्या रामचंद्र यांनी स्थापित केलेले प्रभु शंकराचे मंदिर अतिशय निसर्गरम्य ठीकाणी आहे.

रिसोड येथील काही प्रसिद्ध ठिकाणे --

अमरदासबाबा संस्थान[संपादन]

अमरदासबाबा मंदिर संस्थान हे रिसोड गावातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. संत अमरदासबाबा हे रिसोड गावात वास्तव्यास असणारे योगी होते. अमरदासबाबा मंदिर हे त्यांचे पावन समाधि स्थळ आहे. मंदिराचा परिसर अतिशय रम्य असून तेथे गंगा मॉं उद्यान सुद्धा आहे. मंदिराच्या कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचप्रमाणे मारूती व इतर देवी - देवतांची मंदिरे आहेत. महाशिवरात्री पर्वावर येथे मोठी जत्रा असते. या काळात गावाच्या आठवडी बाजाराचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येते.

पिंगलाक्षी देवी संस्थान[संपादन]

पिंगलाक्षी देवी संस्थान हे संस्थान गावाच्या दक्षिण-पश्चिम दिशेश असून ते तलावाच्या भिंतीवर आहे. त्या रठिकाणी पूर्वाभिमुख देवीची मूर्ती मंदिरात असून नवरात्राच्या वेळी मंदिराची सजावट करून नऊ दिवस लोकांची प्रचंड गर्दी असते

३. रत्नेश्वर संस्थान

४. गजानन महाराज मंदिर

५. गणेश मंदिर

६. शीतला माता संस्थान

शीतला माता मंदिर हे रिसोड गावातील गुजरी चौक येथे आहे.

७. चाफ़ेश्वर संस्थान

८. खोलेश्वर संस्थान

९. सिद्धेश्वर संस्थान

आप्पास्वामी संस्थान[संपादन]

आप्पास्वामी संस्थान हे रिसोड गावातील आसनगल्ली येथे आहे. येथे आप्पास्वामी महाराजांची समाधी आहे. येथे नवस फेडताना चरण खेळणयाची प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे.

श्री आपा स्वामी महाराज संस्थान रिसोड या ठिकाणी आपास्वामी महाराजांची संजिवन समाधी असुन त्यालाच आसन असे जनसामान्याकडून संबोधण्यात येते.

शॄंगाल सरोवरा निकट शिंगाळा (श्री क्षेत्र क्षीरसागर)[संपादन]

ह्याच रिसोड/ऋषिवट गावी शॄंगाल सरोवरा निकट शिंगाळा (श्री क्षेत्र क्षीरसागर) हे श्री आप्पा स्वामी महाराजांचे तपश्चर्या करण्याचे ऐतिहासिक स्थान आहे. श्री पिंगलाक्षी देवी मंदिराच्या मागील भागाला शिंगाळा हे ठिकाण आहे. जवळच गोरक्षनाथ यांची टेकडी आहे. नाथ महाराजांच्या “आम्ही राहतो माळावरी, तुम्ही बैसावे क्षीरसागरी” या उक्ती नुसार श्री आप्पा स्वामी महाराजांनी तपश्चर्येसाठी हे स्थान निवडले असावे. ते दत्तात्रेयांचे अनुग्रहीत होते. शिंगाळा हे ठिकाण घनदाट अरण्यात स्थित आहे. हे ठिकाण अतीशय रमणीय व निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पशु-पक्षी पहावयास मिळतात.

रिसोड मधील श्री आप्पास्वामी संस्थान (आसन)[संपादन]

रिसोड नगरिच्या पश्चिमेच्या परिसरात श्री आप्पा स्वमी संस्थान (आसन) आहे. याठिकाणी महाराजांची संजिवन समाधी आहे. येथे महाराजांचे वास्तव्य होते. संस्थानाच्या भव्य वास्तूत त्यांच्या काळातील अनेक वस्तू संग्रहीत आहेत. संस्थानाला अतिशय भव्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर मुख्य वास्तूत चौखाणी बैठक, ध्यानकक्ष, व गाभारा आहे. ह्या गाभऱ्यातच म्हाराजांची संजिवन समाधी आहे. तसेच त्यांची पत्नी विरामाय व पुत्र बाळस्वामी ह्यांची समाधी आहे. गाभाऱ्यात अखंड धुनी प्रज्वलीत आहे व त्याचप्रमाणे अखंड नंदादीप तेवत असतो. गेली चारशे वर्षे नंदादीप व धुनी अखंड प्रज्वलीत आहेत. 

पूर्वेकडे ऐसपैस वाडा व शिखर मंदिर आहे. या शिखर मंदिरात त्यांच्या कुलातील व्यक्तींच्या समाध्या आहेत. त्याच प्रमाणे वाड्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचे व विठ्ठल रखुमाईचे छोटेखानी देव्हारे आहेत. मंदिरावरील भव्य असा पांढरा शुभ्र ध्वज गेली चारशे वर्षे आपली परंपरा जपत आहे. ह्याच वाड्यामध्ये गौरक्षण व पाकशाळा आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर ध्यानकक्ष व समाधी भागात पाय धुऊन प्रवेश करण्याची पद्धत आहे. त्याकरीता प्रवेशा नजिकच विहीर व हौद आहेत. भाविक विहिरीचे पाणी काढून नंतर हात पाय धुऊनच वास्तूत प्रवेश करतात. 

रिसोड महात्म्य व महाराजांचे रिसोडला आगमन[संपादन]

एका आख्यायीकेनुसार द्वापार युगात पांडव वनवासात असतांना त्यांचे सत्त्वहरण करण्यासाठी कौरवांनी दुर्वास ऋषीसह अनेक ऋषी मुनिंना पांडवाकडे पाठवले होते. त्यावेळी पांडव ऋषिवट ग्रामीच होते. येथे येऊन ऋषींनी द्रौपदीस रात्री भोजन मागीतले होते. त्यावेळेस द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट केले होते. पुढे ते ॠषी या ठिकाणी वास्तव्यास राहीले त्यामुळे या ग्रामास ॠषीवट हे नाव मिळाले. रिसोड येथील एक आप्पास्वामी भक्त रखुमाबाई देशमुख यांनी महाराजांना आपल्या भक्तीने प्रसन्न करून येथे आणले. “महाक्षेत्र जाणोनी आलो या ऋषीवट धामा” या महाराजांच्या रचनेनुसार या गावाचा महिमा थोर आहे. 

श्री आप्पास्वामीं विषयी अधिक माहिती[संपादन]

श्री आप्पास्वामी महाराजांचा जन्म इ.स. १६०० मध्ये मराठवाड्यातील चारठाण या गावी झाला. त्यांना तिघे बंधु होते. महाराजांना बालवयापासुनच आध्यात्माची गोडी होती. वयाचे १३वे वर्षी ते विवाहबद्ध झाले. त्यांना एक पुत्र व दोने कन्यारत्ने प्राप्त झाली. पुढे त्यांना श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला व परमार्थिक अभ्यास करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचले. गुरू आदेशाप्रमाणे त्यांनी अभंग व पदावली यांची रचना केली. त्यामधुन त्यांनी उपदेश केला. त्यांना भेदभाव मान्य नव्हता. त्यांनी अंधश्रद्धेचे समाजातून उच्चाटन करण्यासाठी उपदेश व अखंड कार्य केले. समाजातील अनिष्ट प्रथा व परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले. मानवता धर्म सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादने त्यांनी अभंग व पदावली यातून केले. ते सर्वधर्म सहिष्णू होते. 

“लखलखाटे सोई न जाने कोई

हिंदू मुस्लिम दोनो भाई

अग्यान लखमाने ज्योत से ज्योत मिलाई”

वरील रचनेवरून त्यांनी हिंदू मुसलमान एकीकरण व्हावे हे प्रतिपादन केल्याचे जाणवते. त्यांना तीन नावांनी संबोधण्यात येते. “लखमा, लक्षधर व आप्पास्वामी”

श्री आप्पास्वामी संस्थानातील कार्यक्रम[संपादन]

येथे नित्य त्रिकाल पूजा होते व त्यानंतर पंचपदी होते. प्रत्येक एकादशीला भजन नियमाने होत असते. भक्तांच्या आयोजनाप्रमाणे अनेकवेळा जागर व शरण आणि नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होतो. संस्थानचा वार्षिक उत्सव हा श्रावण महीन्यात असतो. हा उत्सव भक्त मंडळी संपूर्ण श्रावण महीनाभर साजरा करतात. पोळा व कर ह्या दोन दिवशी महत्त्वपूर्ण कार्यक्रम होतात. त्यामध्ये दहीहंडी, लळीत, अन्नदान ईत्यादी कार्यक्रम होतात. याकाळात संस्थानात हरिविजय या ग्रंथाचे नित्यवाचन होते. पोळ्याचे दुसऱ्या दिवशी या वार्षिक उत्सवाची अन्नदान करून सांगता केली जाते. 

महाराजांनी भक्तांना त्याकाळी अभंगरुपी उपदेश केला आहे जो आजही लागू पडतो. संपूर्ण भारतात श्री आप्पास्वामी महाराजांची ३६५ ठिकाणे आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी महाराज स्वतः गेलेले आहेते म्हणून तेथील भक्तांनी त्या त्या ठिकाणी स्थान मंदिरांची स्थापना केली आहे. आम्ही पाहीलेले रिसोड येथील हे ऐतिहासिक स्थळ चारशे वर्षांच्या अखंड परंपरा व संस्कृतीचे प्रतीक आहे. हे ठिकाण अतीशय रमणीय व शांततापूर्ण आहे. या ठिकाणी गेल्यास आध्यात्मिक ओढ निर्माण होऊन आध्यात्माकडे जाण्याची प्रेरणा मिळते. वरील सर्व माहिती सध्या गादीवर विराजमान असलेले श्री हर्षवर्धन महाराज यांच्या आदेशाप्रमाणे आप्पास्वामी महाराजांचे भक्त श्री यादवराव बाळाजी बुट्टे यांनी श्रींची पदावली व अभंगांचे आधारे उपलब्ध करून दिली आहे.

११. कोपरेश्वर संस्थान'

उत्सव --

पिंगलाक्षी देवी नवरात्री उत्सव

पिंगलाक्षी देवी या रिसोड गावाचे ग्रामदैवत आहे.

व दसरा

अमरदासबाबांची यात्रा

भूगोल[संपादन]

रिसोड तालुक्यातून पैनगंगा ही मोठी नदी वाहते. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात उगम पावते व नंतर गोहगाव येथून रिसोड तालुक्यात प्रवेश करते. कास नदी, पैनगंगा नदीची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगा नदीला शेलगाव राजगुरे या गावाजवळ मिळते. नंतर पैनगंगा आसेगाव जवळ वाहत रिसोड तालुक्याच्या बाहेर जाते. पैनगंगा खोऱ्यातील जमीन इतर भागातील जमिनीपेक्षा अधिक सुपीक आहे. रिसोडच्या दक्षिणेस डोॅंगराळ भाग आहे. रिसोड तालुक्यात सरासरी वार्षिक पाऊस ८५४ मिलिमीटर आहे. मे महिन्या तापमान ४२॰डिग्री सेंटीग्रेड असते.

रिसोड पासून महत्त्वाच्या शहरांची अंतरे[संपादन]

अंतर (कि.मी.)
रिसोड - मुंबई ४२९ कि.मी.
रिसोड - दिल्ली ९६९ कि.मी.
रिसोड - बंगळुरु ७८१ कि.मी.
रिसोड - कोलकाता १२३५ कि.मी.
रिसोड - चेन्नई ८५२ कि.मी.
रिसोड - अहमदाबाद ५५० कि.मी.
रिसोड - हैदराबाद ३३९ कि.मी.
रिसोड - पुणे ३४५ कि.मी.
रिसोड - सुरत ४२० कि.मी.
रिसोड - कानपूर ८१० कि.मी.
रिसोड - जयपूर ७७९ कि.मी.
रिसोड - लखनौ ८७४ कि.मी.
रिसोड - नागपूर २७५ कि.मी.
रिसोड - इंदूर ३२१ कि.मी.
रिसोड - पाटणा १०५९ कि.मी.
रिसोड - भोपाळ ३७३ कि.मी.
रिसोड - नवे पाटणा १०५९ कि.मी.
रिसोड - लुधीयाना १२२० कि.मी.
रिसोड - ठाणे ४०९ कि.मी.
रिसोड - आगरा ८१२ कि.मी.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
वाशिम जिल्ह्यातील तालुके
कारंजा लाड तालुका | मंगरुळपीर तालुका | मालेगाव तालुका | रिसोड तालुका | वाशिम तालुका | मानोरा तालुका