आगरवाडी
?आगरवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रिसोड |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
आगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. आगरवाडी हे गांव पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातले कमी लोकवस्तीचे गांव आहे.
पौराणिक उल्लेख
[संपादन]आगरवाडी हे गांव पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे, असे जुने लोक सांगतात. या भागात पूर्वी फार घनदाट जंगल होते. त्या जंगलात ऋषी मुनी तप करत, आगरवाडी हे हे गांव दंडकारण्य या पौराणिक प्रदेशात येते, या गांवी अगस्ती ऋषी काही काळ आश्रम करून राहले असे जुने जाणकार लोक सांगतात. या गांवाच्या पूर्वेला गोरखनाथ टेकडी आणि प्राचीन रिसोड (ऋषीवट) शहर असून तेथे ऋषीमुनींच वास्तव्य होते. आगरवाडी गांवाच्या पश्चिमेला भर हे गांव असून या गावांत भारद्वाज ऋषीचे मोठे मंदिर आहे. आगरवाडी या गांवाच्या उत्तरेला मांगवाडी हे गांव असून ते रामायणातील उल्लेख असेलेल शबरीचे गुरू मातंग /मतंग ऋषी यांचे वास्तव्य होते. आगरवाडी गांवाच्या दक्षिणेला कंकरवाडी हे गांव असून या गांवी कपिल मुनी तप करत आशी लोकवदंता आहे.
धार्मिक
[संपादन]गांवात महाशिवरात्रीच्या आणि हुनुमान जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमात मागील अनेक वर्षापासून गावात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत महापुराण कथा होते.
गावाच्या उत्तरेला महादेवाचे मंदिर असून याठिकाणी महाशिवरात्रीला एक दिवसाचा मोठा उत्सव होतो. दुसऱ्या दिवशी पारण्याला मोठा भंडारा (महाप्रसाद) वाटतात. हनुमान मंदिराच्या समोर वारकरी पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह कथा रामायण कथा दरवर्षी होते. आठव्या दिवशी काल्याच्या प्रसादाच्या नंतर भव्य महाप्रसादाचे वितरण होते.
शिवजयंती
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी गावातील सर्व लोक मिरवणुकींमध्ये सहभागी होतात. ही शिवजयंती संत भगवानबाबा मंडळ आणि संताजी महाराज मंडळ या मंडळांच्या वतीने साजरी होते.
शालेय
[संपादन]गांवातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेता येते.
प्रशासन
[संपादन]गावात स्वतंत्र ग्रामपंचायत आहे,
उद्योग
[संपादन]आगरवाडी कोणताही मोठा उद्योग नाही. गावांतील लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतात.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.