Jump to content

वर्ग चर्चा:हिंदूंचा छळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदूंचा की हिंदुंचा ?

[संपादन]

येथे "हिंदूंचा" ऐवजी "हिंदुंचा" असावे, असे वाटते. "हिंदू" ला प्रत्यय जोडल्यास उकार र्‍हस्व (हिंदु++) होतो. उदा. हिंदुस्थान, हिंदुत्व, हिंदुंनी, हिंदुंच्या... इ.

@Usernamekiran, Shantanuo, संतोष गोरे, आणि अभय नातू: कृपया आपले मत नोंदवा. --संदेश हिवाळेचर्चा २१:३१, १४ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

प्राथमिक दृष्ट्या तुमचे म्हणणे बरोबर वाटत आहे. परंतु गूगल वर दोन्ही उकार दिसत आहेत. Usernamekiran आणि Shantanuo यांचा यावर चांगला अभ्यास आहे, तेव्हा ते नक्की काय ते बरोबर सांगतील. संतोष गोरे ( 💬 ) ०६:५८, १५ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
हिंदुस्तान,/हिंदुस्थान यात स्तान/स्थान हा प्रत्यय नसून हा समास आहे -- हिंदूं लोकांचेचे स्तान/स्थान/स्थळ -- तरी इतरांपासून याला वेगळे नियम लागू शकतात.
प्रत्यय लावताना माझ्या माहितीप्रमाणे मूळ शब्दाच्या इकार/उकारात बदल केले जात नाहीत. तरीही व्याकरणाचा गाढा अभ्यास असणाऱ्यांचे मत येथे आवश्यक आहे.
अभय नातू (चर्चा) ०४:००, १६ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
हिंदुस्थान, हिंदुत्व हे शब्द बरोबर तर हिंदुंनी, हिंदुंच्या हे शब्द चूक. ते हिंदूंनी, हिंदूंच्या असे हवे कारण विभक्ती प्रत्यय जोडताना उकार किंवा इकार पहिला होत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/ फायरफॉक्समधील स्पेल चेकरचा उपयोग केला तर असे प्रश्नच उद्भवणार नाहीत. गूगल क्रोम वापरत असाल तर विकीच्या पानाचा ऍड्रेस इथे पेस्ट करा. http://shantanuoak.com:5000/ म्हणजे चुकीचे शब्द निवडले जातील. Shantanuo (चर्चा) ११:१४, २१ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]