Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ फेब्रुवारी २०१८ – ३ एप्रिल २०१८
संघनायक फाफ डू प्लेसी स्टीव स्मिथ
टिम पेन (तिसरी कसोटीचा ५वा दिवस आणि चौथी कसोटी
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा एडन मार्करम (४८०) कॅमेरुन बँक्रोफ्ट (२२३)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (२३) पॅट कमिन्स (२२)
मालिकावीर कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ ४ कसोटी सामने खेळतील. दक्षिण आफ्रिकेवरची बंदी उठविल्यानंतर या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांची ही मालिका प्रथमच खेळविण्यात येत आहे. कसोटी मालिकेआधी तीनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याने केली.

कसोटी मालिका
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

दौरा सुरू होण्याआधी दुखापतीमुळे जॅक्सन बर्ड संघातून बाहेर पडला. त्याच्या जागी चॅड सेयर्सला संघात सामील केले गेले.[]. टेंबा बावुमाला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामना खेळू शकला नाही.

दौरा सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि ऑस्ट्रेलियन्स

[संपादन]
२२-२४ फेब्रुवारी २०१८
धावफलक
दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश दक्षिण आफ्रिका
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स
२२० (५८.५ षटके)
थेउनिस डि ब्रुइन ४६ (४३)
पॅट कमिन्स ४/३२ (११ षटके)
३२९ (९०.४ षटके)
पॅट कमिन्स ५९* (९५)
ब्रुईन हेंड्रिक्स ५/८३ (२४.४ षटके)
२४८ (७२.५ षटके)
शाॅन वाॅन बर्ग ५२ (४३)
मिचेल स्टार्क ४/४६ (१५ षटके)
१४०/५ (२९.३ षटके)
शाॅन मार्श ३९* (४६)
ड्वेन ऑलिव्हिये ४/७४ (१२.३ षटके)
ऑस्ट्रेलियन्स ५ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी, ग्वाटेंग
पंच: फिलीप वुस्लो (द.आ.) आणि जाॅन क्लोएट (द.आ.)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश, फलंदाजी


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१-५ मार्च २०१८
धावफलक
वि
३५१ (११०.४ षटके)
मिचेल मार्श ९६ (१७३)
केशव महाराज ५/१२३ (३३.४ षटके)
१६४ (५१.४ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ७१* (१२७)
मिचेल स्टार्क ५/३४ (१०.४ षटके)
२२७ (७४.४ षटके)
कॅमेरून बँक्राॅफ्ट ५३ (८३)
केशव महाराज ४/१०२ (२९.४ षटके)
२९८ (९२.४ षटके)
एडन मार्करम १४३ (२१८)
मिचेल स्टार्क ४/७५ (१८ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • मिचेल मार्श (ऑ) ने १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
  • तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकारामुळे खेळ लवकर थांबवण्याय आला.


२री कसोटी

[संपादन]
९-१३ मार्च २०१८
धावफलक
वि
२४३ (७१.३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६३ (१००)
कागिसो रबाडा ५/९६ (२१ षटके)
३८२ (११८.४ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स १२६* (१४६)
पॅट कमिन्स ३/७९ (२४ षटके)
२३९ (७९ षटके)
उस्मान खवाजा ७५ (१३६)
कागिसो रबाडा ६/५४ (२२ षटके)
१०२/४ (२२.५ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स २८ (२६)
नेथन ल्यॉन २/४४ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, ईस्टर्न केप
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि क्रिस गॅफने (न्यू) (९ मार्च)
एस. रवी (भा) (१०-१३ मार्च)
सामनावीर: कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • एस. रवी (भा) यांनी क्रिस गॅफने (न्यू) यांच्या अनुपस्थितीत कसोटीच्या दुसऱ्या दिवसापासून पंचगिरी केली.
  • शॉन मार्श (ऑ) याने २,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.


३री कसोटी

[संपादन]
२२-२६ मार्च २०१८
धावफलक
वि
३११ (९७.५ षटके)
डीन एल्गार १४१* (२८४)
पॅट कमिन्स ४/७८ (२६ षटके)
२५५ (६९.५ षटके)
कॅमेरून बँक्रोफ्ट ७७ (१०३)
मॉर्ने मॉर्केल ४/८७ (२१ षटके)
३७३ (११२.२ षटके)
एडन मार्करम ८४ (१४५)
पॅट कमिन्स ३/६७ (२७ षटके)
१०७ (३९.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ३२ (६७)
मॉर्ने मॉर्केल ५/२३ (९.४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२२ धावांनी विजयी
सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केपटाउन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: मॉर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)


चेंडूत अफरातफर

[संपादन]

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला दूरचित्रवाणीवर चेंडूवर काहीतरी वस्तू घासत असताना टिपले गेले. अधिक चौकशीनंतर संघनायक स्टीव स्मिथने कबूल केले की स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि संघनेतृत्वाने बँक्रॉफ्टला असे करण्यास सांगितले होते. सामनाधिकाऱ्याने स्मिथ आणि वॉर्नरवर एक कसोटी सामन्याची बंदी घातली. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना अर्ध्या सामन्यात संघनायक आणि उपनायकपदावरून काढून टाकले व यष्टीरक्षक टिम पेनला काळजीवाहू संघनायक म्हणून नेमले.[]

या कृतीची जगभर निर्भत्सना झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलॅंड आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व अधिकाऱ्यांनी ही घटना ऑस्ट्रेलियातील क्रिकेटला लाजिरवाणी असल्याचे म्हणले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना १ वर्ष व प्रत्यक्ष कृती करणारा सहखेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला ९ महिन्यांची बंदी घातली.

४थी कसोटी

[संपादन]
३० मार्च - ३ एप्रिल २०१८
धावफलक
वि
४८८ (१३६.५ षटके)
एडन मार्करम १५२ (२१६)
पॅट कमिन्स ५/८३ (२८.५ षटके)
२२१ (७० षटके)
टिम पेन ६२ (१६१)
व्हर्नॉन फिलान्डर ३/३० (१८ षटके)
३४४/६घो (१०५ षटके)
फाफ डू प्लेसी १२० (१७८)
पॅट कमिन्स ४/५८ (१८ षटके)
११९ (४६.४ षटके)
ज्यो बर्न्स ४२ (८०)
व्हर्नॉन फिलान्डर ६/२१ (१३ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४९२ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: इयान गुल्ड (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: व्हर्नॉन फिलान्डर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : चॅड सेयर्स (ऑ)
  • मॉर्ने मॉर्केलचा (द.आ.) हा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.
  • टिम पेन (ऑ) याने ऑस्ट्रेलियाचा ४३वा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले.
  • व्हर्नॉन फिलान्डर (द.आ.) याने २००वा कसोटी बळी घेतला.
  • कसोटीत धावांच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय.
  • कसोटीत धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात मोठा पराभव. (याआधी १९२८ मध्ये ब्रिस्बेन येथे इंग्लंडविरुद्ध ६७५ धावांनी पराभव)


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "चॅड सेयर्सला ऑस्ट्रेलिया संघात स्थान, जॅक्सन बर्ड दुखापतग्रस्त".
  2. ^ "स्टीव स्मिथ banned for one Test, Bancroft given three demerit points". ESPNcricinfo. 2018-03-26 रोजी पाहिले.