अगं बाई अरेच्चा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अगं बाई अरेच्चा २
संगीत निषाद गंभीर, सई आणि पियुष
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २२ मे २०१५



अगं बाई अरेच्‍या २ हा इ.स. २०१५ मधील मराठी चित्रपट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सहलेखन केदार शिंदे यांनी केले आहे.[१] अगं बाई अरेच्चा! या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. काही चित्रपट समीक्षकांच्या मते, अगा बाई अरेच्‍या २ हा मराठी चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याच्या संगीतालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.

दिवंगत शाहीर साबळे यांचे नातू असल्याने दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये चांगले संगीत देणारे म्हणून ओळखले जातात. 'केदार शिंदे प्रॉडक्शन' आणि 'अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली नरेंद्र फिरोदिया, बेला शेंडे आणि सुनील लुल्ला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि इरॉस इंटरनॅशनलने त्याचे वितरण केले होते.[२] या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, धर्मेंद्र गोहिल, सुरभी हांडे, शिवराज वायचळ, मिलिंद फटक, भरत जाधव आणि प्रसाद ओक या कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात सिद्धार्थ जाधवची खास भूमिका आहे. हा चित्रपट २२ मे २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता.

पात्र[संपादन]

गीत आणि संगीत[संपादन]

अगं बाई अरेच्चा २
संगीत द्वारे
निषाद
प्रदर्शित मे ८, इ.स. २०१५ (2015-05-08)[३]
शैली चित्रपट गीत
लांबी २६ मिनिटे, २७ सेकंद
भाषा मराठी
फीत व्हिडिओ पॅलेस

या चित्रपटाचे पार्श्वसंगीत साई आणि पियुष यांनी संगीतबद्ध केले असून निषाद यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गीते अश्विनी शेंडे, ओंकार मंगेश दत्त आणि मनोहर गोलांबरे यांनी लिहिली आहेत.

गाण्याची यादी
क्र. शीर्षकगायक अवधी
१. "जगण्याचे भान हे"  शंकर महादेवन 04:47
२. "एक पोरगी"  मनोहर गोलांबरे 05:09
३. "माझा देव कुणी पाहिला"  मनोहर गोलांबरे 05:00
४. "फुल टू फटाका"  आदर्श शिंदे 05:08
५. "दिल मेरा"  वैशाली सामंत 06:23

समीक्षा आणि टीका[संपादन]

टाईम्स ऑफ इंडियाचे मिहीर भानागे यांनी या चित्रपटाला ५ पैकी २.५ रेटिंग दिले आणि ते म्हणाले की,"जेव्हा तुमच्याकडे सोनाली, भरत, प्रसाद आणि मिलिंद फाटक सारखे कलाकार असतील, तेव्हा तुम्ही चित्रपट पाहायला जाल अशी अपेक्षा असते. विशेष म्हणजे, हे सर्व चांगले अभिनेते आहेत. पण जेव्हा तुम्ही चित्रपटाच्या उत्तरार्धात पोहोचता तेव्हा तुम्ही उच्च अपेक्षा आणि सर्वसाधारण सादरीकरण यात फसलेले असता. चित्रपटाच्या शेवटी, तुम्ही पूर्णपणे निराश होतात." मराठी स्टार्सच्या केयुर सेटा ने चित्रपटाला ५ पैकी २ असे रेटिंग दिले आणि त्यावर अशी प्रतिक्रिया दिली की, "अगं बाई अरेच्‍या२ हा चित्रपट मूलभूत मुद्द्यांमुळे अयशस्वी झाला आहे."

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Why Kedhar Shinde changed his screen name?". timesofindia.com. 6 April 2015. 6 April 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "First Look of 'Aga Bai Arechha 2' Released". zeetalkies.com. Archived from the original on 2015-04-16. 2022-05-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Aga Bai Arechyaa 2 (Original Motion Picture Soundtrack)". iTunes.

बाह्य दुवे[संपादन]