केदार शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केदार शिंदे
जन्म जानेवारी १६, १९७३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन (चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका)
प्रमुख नाटके सही रे सही, लोच्या झाला रे
प्रमुख चित्रपट जत्रा
प्रमुख टीव्ही कार्यक्रम श्रीयुत गंगाधर टिपरे

केदार शिंदे हा मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक आहे. त्याने मराठी भाषेत नाटके, मालिका व चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.

कारकीर्द[संपादन]

केदार शिंदे हा शाहीर साबळ्यांचा नातू आहे. त्याला आधीपासूनच कलेची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती.

केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.

नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम सॉंगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही.

चित्रपट[संपादन]

  • अगं बाई... अरेच्या (२००६)
  • जत्रा (२००६)
  • यंदा कर्तव्य आहे (२००६)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • ह्यांचा काही नेम नाही (२००८)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००८)
  • गलगले निघाले (२००८)
  • इरादा पक्का (२०१०)

नाटके[संपादन]

  • सही रे सही
  • बॉम्ब-ए-मेरी-जान
  • लोच्या झाला रे
  • श्रीमंत दामोदरपंत
  • मनोमनी
  • विजय दिनानाथ चव्हाण
  • आता होऊनच जाऊ दे
  • तू तू मी मी
  • गोपाला रे गोपाला
  • आमच्या सारखे आम्हीच
  • ढॅण्टॅढॅण

दूरदर्शन मालिका[संपादन]