Jump to content

सूर्यमाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सुर्यमाळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.५२७६५ चौ. किमी
जवळचे शहर मोखाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,१९६ (२०११)
• ७८३/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

सुर्यमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२० कुटुंबे राहतात. एकूण ११९६ लोकसंख्येपैकी ५८५ पुरुष तर ६११ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

आडोशी, पाथर्डी, बोटोशी, कुरलोड, केवनाळे, धुडगाव, गोमघर, खोडाळा, जोगळवाडी, सायडे, वाकडपाडा ही जवळपासची गावे आहेत.सुर्यमाळ ग्रामपंचायतीमध्ये आमाळे,केवनाळे आणि सुर्यमाळ ही गावे येतात.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/