होकुरिकू शिनकान्सेन
होकुरिकू शिनकान्सेन | |||
---|---|---|---|
स्थानिक नाव | 北陸新幹線 | ||
प्रकार | शिनकान्सेन | ||
प्रदेश | जपान | ||
स्थानके | २३ | ||
कधी खुला | १ ऑक्टोबर १९९७ | ||
चालक | पूर्व जपान रेल्वे कंपनी व पश्चिम जपान रेल्वे कंपनी | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | ३४५.४ किमी (२१५ मैल) | ||
गेज | १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज | ||
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी | ||
कमाल वेग | २६० किमी/तास | ||
|
होकुरिकू शिनकान्सेन (जपानी: 北陸新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. ३४५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानची राजधानी तोक्योला कानाझावा ह्या शहरासोबत जोडतो. तोक्यो स्थानक ते मध्य जपानमधील ताकासाकी ह्या शहरापर्यंत होकुरिको शिनकान्सेन व जेत्सू शिनकान्सेन हे दोन्ही मार्ग एकत्रच धावतात.
इतिहास
[संपादन]१ ऑक्टोबर १९९७ रोजी हा मार्ग ताकासाकी ते नागानोदरम्यान रेल्वे वाहतूकीसाठी खुला करण्यात आला ज्याचा उपयोग १९९८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी झाला. तेव्हा हा रेल्वेमार्ग नागानो शिनकान्सेन ह्या नावाने ओळखला जात असे. नागानो ते कानाझावा दरम्यानच्या मार्गाचे बांधकाम २०१५ साली पूर्ण झाले. भविष्यात हा मार्ग क्योतोमार्गे ओसाका स्थानकापर्यंत वाढवला जाईल.
प्रमुख शहरे
[संपादन]होकुरिकू शिनकान्सेन मार्ग जपानमधील खालील प्रमुख शहरांना राजधानी तोक्योसोबत जोडतो.
इंजिन व डबे
[संपादन]होकुरिकू शिनकान्सेनसाठी डब्ल्यू७ प्रणालीच्या रेल्वेगाड्या वापरल्या जातात. हिताची कंपनीने बनवलेल्या ह्या गाडीचा कमाल वेग २६० किमी/तास इतका आहे.