Jump to content

तोहोकू शिनकान्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोहोकू शिनकान्सेन
स्थानिक नाव 東北新幹線
प्रकार शिनकान्सेन
प्रदेश जपान
स्थानके २३
कधी खुला २३ जून १९८२
चालक पूर्व जपान रेल्वे कंपनी
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ६७४.९ किमी (४१९ मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३२० किमी/तास
मार्ग नकाशा

तोहोकू शिनकान्सेन (जपानी: 東北新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. ६७५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानच्या तोहोकू प्रदेशामधून धावतो व राजधानी तोक्योला उतरेकडील ओमोरी ह्या शहरासोबत जोडतो. १९८२ साली खुला करण्यात आलेला हा शिनकान्सेन मार्ग २०१६ मध्ये होक्काइदो शिनकान्सेन मार्गाद्वारे होक्काइदो बेटापर्यंत वाढवण्यात आला. यामागाता शिनकान्सेनअकिता शिनकान्सेन हे दोन छोटे शिनकान्सेन उपमार्ग देखील तोहोकू शिनकान्सेनचा भाग मानण्यात येतात.

तोहोकू शिनकान्सेन मार्ग जपानच्या तोक्यो; सैतामा, तोचिगी, फुकुशिमा, मियागी, इवातेओमोरी ह्या राजकीय प्रदेशांमधून धावतो.

प्रमुख शहरे

[संपादन]

तोहोकू शिनकान्सेन मार्ग जपानमधील खालील प्रमुख शहरांना राजधानी तोक्योसोबत जोडतो.

बाह्य दुवे

[संपादन]