१९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिका
दिनांक ५-७ एप्रिल १९८६
स्थळ श्रीलंका श्रीलंका
निकाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानने जास्ती धावगतीच्या जोरावर स्पर्धा जिंकली.
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
दुलिप मेंडीस इम्रान खान (१ सामना)
जावेद मियांदाद (१ सामना)
जॉन राइट
सर्वात जास्त धावा
अर्जुन रणतुंगा (८०) जावेद मियांदाद (१३५) मार्टिन क्रोव (७९)
सर्वात जास्त बळी
कौशिक अमालियान (४) मोहसीन कमल (४) मार्टिन स्नेडन (५)

१९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिका अर्थात प्रायोजकत्वामुळे संबोधली गेलेली १९८५-८६ जॉन प्लेयर तिरंगी मालिका ही ५ ते ७ एप्रिल १९८६ या कालावधीमध्ये श्रीलंकेत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान श्रीलंकासह पाकिस्तान आणि न्यू झीलंड या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा भारताने १९८६ आशिया चषकातून माघार घेतल्याने त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भरवली गेली. १९८६ आशिया चषकाच्या बरोबरीनेच ही तिरंगी स्पर्धा पार पडली.

सर्व संघांनी एकमेकांविरुद्ध एक सामना खेळला. तिन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकल्याने निव्वळ धावगतीच्या जोरावर पाकिस्तानने गुणफलकात अव्वल स्थान पटकावत स्पर्धा जिंकली.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.७३६ विजयी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.५१९
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.८९१

गट फेरी[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ एप्रिल १९८६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३७/९ (४३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४०/४ (३६.२ षटके)
दुलिप मेंडीस २४ (३१)
विली वॉट्सन ३/१५ (९ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: मार्टिन स्नेडन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.
  • विली वॉट्सन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

६ एप्रिल १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९१/९ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९५/५ (४२.२ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)

३रा सामना[संपादन]

७ एप्रिल १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१४/८ (४२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१७/६ (४०.४ षटके)
मार्टिन क्रोव ७५ (८५)
मोहसीन कमल ४/४७ (८ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला.