Jump to content

गजरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूतील स्त्रियांच्या केसांत माळलेले गजरे
पाकिस्तानातील बंगालीपद्धतीचा गजरा

गजरा म्हणजे फुलांच्या छोट्या माळेसारखे केसांत माळायचा आभूषणाचा प्रकार असतो. दक्षिण आशियाआग्नेय आशियात हे केशाभूषण सहसा स्त्रियांमध्ये प्रचलित असलेल्या वेणी, अंबाडा इत्यादी केशरचनांमध्ये गुंफले जाते. गजरा बहुतेक करून मोगरा या फुलाचा असतो. तसेच या मध्ये अबोली या फुलांचा वापर करतात

गजरा ही फुलांची एक माळ आहे जी दक्षिण आशियातील महिला सणाच्या प्रसंगी, विवाहसोहळ्यांमध्ये किंवा दररोज पारंपारिक वेषभूषा म्हणून घालतात. ते सहसा गुलाब, मोगरा, चमेली, अबोली इत्यादी वेगवेगळी फुले वापरून बनवली जातात. हे केसांच्या जुडयावर किंवा वेणीला गुंफुन परिधान केले जाऊ शकतात. दक्षिण आशियातील महिला सहसा गजरा हा पारंपारिक पोशाखा बरोबर घालतात. दक्षिण आशियातील स्त्रिया प्रामुख्याने सणाच्या प्रसंगी आणि लग्नाच्या वेळी मनगटात सुद्धा गजरा घालतात. परंतु गजरा हा अलंकार पूर्णपणे केशरचना सजवण्यासाठी वापरला जातो.