चिंबावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चिंबावे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.१२४ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,३३९ (२०११)
• १०,७९८/किमी
भाषा मराठी
सरपंच गगन कोदया
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०२
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

चिंबावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे 'पुष्पक'गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ९.५ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २८० कुटुंबे राहतात. एकूण १३३९ लोकसंख्येपैकी ६६४ पुरुष तर ६७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.६४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.२७ आहे तर स्त्री साक्षरता ४८.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.२५ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.हे डहाणूतील पहिले करोनामुक्त गाव आहे.[१]

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

रामपूर, घोलवड, विकासनगर,चिखळे, नारळीवाडी, आंबेवाडी, नरपड, ठाकूरवाडी, वाकी, झारळी, कैनाड ही जवळपासची गावे आहेत.चिंबावे ग्रामपंचायतीमध्ये चिंबावे आणि नारळीवाडी ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स मंगळवार १५ जून २०२१