Jump to content

चाम नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चाम नृत्यातील मुखवटा

चाम नृत्य हे आशियाई देश भूतानमधील प्रसिद्ध नृत्य आहे.(तिबेटी भाषेत འཆམ་ तसेच चिनी भाषेत 羌姆).

भौगोलिक स्थाने

[संपादन]
डॉसमोचे महोत्सवादरम्यान लेह पॅलेस, लडाख, भारत येथे चाम नृत्य

चाम नृत्य हे भारतात हिमालय पर्वतराजीतील लडाख, धरमशाला,स्पिती व्हॅली, सिक्कीम आणि भारताबाहेर भूतान आणि तिबेट येथे केले जाते.[]

वैशिष्ट्य

[संपादन]

चेहऱ्याला मुखवटे लावून आणि रंगीबेरंगी चित्रविचित्र पोशाख घालून केले जाणारे हे नृत्य तिबेटमधील बौद्ध धर्मातील उत्सवांचे महत्त्वाचे अंग आहे.[]

या बौद्ध धार्मिक नृत्याचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. या नृत्यातून नैतिक उपदेश केला जातो.

१. हरीण आणि शिकारी यांचे नृत्य

२. राजपुत्र आणि राजकन्या यांचे नृत्य

३. मृत आत्म्यांना दूर पाठवून एखादे स्थान पवित्र करण्यासाठीचे नृत्य[]

यम देवता नृत्य- भूतान

धार्मिक महत्त्व

[संपादन]

पूर्वी बौद्ध मठाच्या आवारात प्रामुख्याने भिक्षू मंडळी हे नृत्य करीत असत.[] आता बौद्ध मठातील भिक्षू एकसाथ गायन करतात आणि त्यावर हे पारंपरिक नृत्य सादर करतात. जगातील सर्व प्राणिमात्रांबद्दल करुणा बाळगण्याचा संदेश या नृत्यातून दिला जातो.[] [] चाम नृत्याच्या माध्यमातून ध्यान केले जाते आणि देवाशी संवाद साधला जातो, अशी यामागील आध्यात्मिक भूमिका आहे. पद्मसंभव याची जीवनकहाणी कथन करणे असा या नृत्यात मुख्य भाग असतो. आठव्या शतकात भूतानमध्ये बौद्ध धर्माची स्थापना करणारे गुरू रिम्पोचे यांना पद्मसंभव असे संबोधिले जाते.

तिबेटी मिथककथांमधील पात्रे या नृत्यात साकारली जातात.

स्वरूप

[संपादन]

पायाच्या जलद हालचाली आणि ऊर्जावान जलदगतीने नृत्य असे या नृत्याचे स्वरूप आहे. पाचवे दलाई लामा यांनी याचे स्वरूप नोंदवताना म्हणले आहे की जेव्हा नृत्यात हाताच्या वेगवान हालचाली होतात तेव्हा त्याला "गर" म्हणले जाते तर पायाच्या हालचालींना प्राधान्य असताना त्याला "चाम" म्हणले जाते.[] चाम या नृत्य प्रकारात वाईट शक्तींवर विजय मिळविणे अशीही भावना असते.यामध्ये मृत्युदेवतेचे (यमाचेही) पात्र साकारले जाते.[] बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विरोधात असलेल्या शक्तीही या नृत्यात साकारल्या जातात.[]

लेह येथील नृत्य

वाद्यांची साथ

[संपादन]

चाम तसेच अन्य बौद्ध धार्मिक नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली वाद्यांची साथ होय. नृत्य चालू असताना बौद्ध भिक्षू बौद्ध धर्मग्रंथातील विविध वचनांचे पठण करीत असतात. या नृत्याला डांगचेन, गियालीन, शंख या वाद्यांची पूरक साथ मिळते.

भूतान

[संपादन]

भूतानमध्ये विशेषतः शेचू या वार्षिक धार्मिक उत्सवात हे नृत्य केले जाते. भूतानच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे नृत्य होते. धर्मगुरू असलेले स्त्री - पुरुष तसेच गावातील लोक मिळून हे नृत्य करतात.[१०]

तिबेट

[संपादन]

तिबेटमध्ये मोनालम नावाचा वार्षिक प्रार्थना उत्सव होतो त्यामध्ये हे नृत्य केले जाते.[११]

नृत्याची झलक दाखविणारी चित्रफीत

[संपादन]
Cham dance during Dosmoche festival 2018 at Leh Palace

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "All about Cham Dance : A Ritual Dance by Tibetan Monks". Leh Ladakh India (इंग्रजी भाषेत). 2018-03-23. 2018-11-18 रोजी पाहिले.
  2. ^ Pearlman, Ellen (2002-12). Tibetan Sacred Dance: A Journey Into the Religious and Folk Traditions (इंग्रजी भाषेत). Inner Traditions / Bear & Co. ISBN 978-0-89281-918-8. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ pommare, françoise (June 2015). A Cultural Epiphany: Religious Dances of Bhutan and Their Costumes. http://www.bhutansociety.org/Pommaret.pdf: Bhutan Society. line feed character in |title= at position 49 (सहाय्य)
  4. ^ "Cham Dance: The Masked Ritual". History and Development of Dance/ Brockport (इंग्रजी भाषेत). 2013-05-16. 2018-11-18 रोजी पाहिले.
  5. ^ Pearlman, Ellen (2002). Tibetan Sacred Dance: a Journey into the Religious and Folk Traditions. Inner Traditions / Bear & Co. pp. 21, 32, 180. ISBN 0-89281-918-9. Retrieved 2011-10-16.
  6. ^ Clements, William M. (2006). The Greenwood Encyclopedia of World Folklore and Folklife: Southeast Asia and India, Central and East Asia, Middle East. 2. Greenwood Press. pp. 106–110. ISBN 0-313-32849-8. Retrieved 2011-10-16.
  7. ^ Pearlman, Ellen (2002-12). Tibetan Sacred Dance: A Journey Into the Religious and Folk Traditions (इंग्रजी भाषेत). Inner Traditions / Bear & Co. ISBN 978-0-89281-918-8. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Ganeri, Anita (2003-08-01). Buddhist Festivals Through the Year (इंग्रजी भाषेत). Black Rabbit Books. ISBN 978-1-58340-375-4.
  9. ^ Powers, John (2013-10-01). A Concise Encyclopedia of Buddhism (इंग्रजी भाषेत). Oneworld Publications. ISBN 978-1-78074-476-6.
  10. ^ The Journal of Social Studies (इंग्रजी भाषेत). Centre for Social Studies. 2005.
  11. ^ "Backgrounder: Monlam Prayer Festival_English_Xinhua". 2012-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-18 रोजी पाहिले.