Jump to content

यष्टिरक्षक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यष्टिरक्षक

यष्टिरक्षक हा क्रिकेट खेळामधील एक खेळाडू आहे जो त्याचा संघ क्षेत्ररक्षण करीत असताना स्टंप्सच्या मागे उभा राहतो. जर द्रुतगती गोलंदाजी चालू असेल तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब उभा राहतो व फिरकी गोलंदाजी चालू असताना यष्ट्यांच्या जवळ उभा राहतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये केवळ यष्टीरक्षकालाच हातमोजे (ग्लोव्ह्ज) व पायांना पॅड्स बांधायची परवानगी आहे. यष्टिरक्षकाची कर्तव्ये खालीलप्रमाणे:

  • फलंदाजाच्या बॅटचा कडा घेऊन आलेले चेंडू झेलणे.
  • फलंदाज आपल्या क्रीझच्या बाहेर पडला असेल त्याला यष्टिचीत करण्याचा प्रयत्‍ना करणे.
  • क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडून धावा घेत असलेल्या फलंदाजांना धावचीत करण्याचा प्रयत्‍न करणे.

क्रिकेटच्या नियमांनुसार सामन्यादरम्यान यष्टीरक्षक जखमी अथवा जायबंदी झाल्यास बदली यष्टिरक्षकाला बोलावता येत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इतर १० खेळाडूंपैकी एकालाच हे काम सांभाळावे लागते.

सर्वात यशस्वी यष्टिरक्षक

[संपादन]

कसोटी क्रिकेट

[संपादन]
क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1 मार्क बाउचर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 147 532 23 555
2 ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 96 379 37 416
3 इयन हिली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 119 366 29 395
4 रॉडनी मार्श ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 96 343 12 355
5 महेंद्रसिंह धोनी भारतचा ध्वज भारत 90 256 38 294
6 जेफ दुजॉं वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 81 265 5 270
7 ॲलन नॉट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 95 250 19 269
8 मॅट प्रायर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 79 243 13 256
9 ॲलेक स्टुअर्ट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 133 227 14 241
10 वसिम बारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 81 201 27 228

टीपा

  1. ३१ डिसेंबर २०१४ अखेर
  2. विद्यमान खेळाडू

एकदिवसीय क्रिकेट

[संपादन]
क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1 कुमार संघकारा 2 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 404 383 99 482
2 ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 287 417 55 472
3 मार्क बाउचर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 295 402 22 424
4 महेंद्रसिंह धोनी 2 भारतचा ध्वज भारत 261 244 85 329
5 मोइन खान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 219 214 73 287
6 ब्रेंडन मॅककुलम2 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 248 227 15 242
7 इयन हिली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 168 194 39 233
8 रशीद लतीफ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 166 182 38 220
9 रोमेश कालुवितरणा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 189 131 75 206
10 जेफ दुजॉं वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 169 183 21 204

टीपा

  1. ३० जानेवारी २०१५ अखेर
  2. विद्यमान खेळाडू