Jump to content

सदस्य चर्चा:अभयघैसास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे अभयघैसासचे बोलपान आहे. त्याला संदेश ठेवण्यास या पानाचा वापर करावा.

दिनविशेष

[संपादन]

अभय,

एखादी घटना दिनविशेषमध्ये लिहीण्याकरिता जुजबीच पाने edit करायला लागतात.

१. त्या दिवशीचे पान. उदा. फेब्रुवारी २० २. त्या वर्षाचे पान. उदा. इ.स. १८६४

याशिवाय, जर ती घटना एखाद्या विशिष्ट लेखात उद्धृत असेल तर त्या लेखातही भर/बदल करावे लागेल. उदा. लो.टिळकांना झालेली अटक ही भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, या लेखात बसू शकेल. या साठी, एक 'शोध' करून बघावा. या उदाहरणात 'टिळक', 'स्वातंत्र्यसंग्राम', इ. शोध केल्यास अनुरूप लेख मिळतील.

क.लो.अ.

User talk:अभय नातू

ठिकाणांची नावे

[संपादन]

अभय,

तुमचा अमेरिकन गृहयुद्धावरचा लेख सुंदर आहे.

आपणास एक विनंतीवजा सूचना करावयाची आहे. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाचे नाव वापरत असाल, तेव्हा त्याचे भाषांतर करू नये. उदा. फोर्ट सम्टर, फोर्ट हेन्री वगैरे. त्यास दोन कारणे -

  1. ठिकाणाचे नाव विशिष्ट नाव आहे (proper noun) व त्याचे भाषांतर होत नाही. प्रति उदाहरण द्यायचे झाल्यास, आनंद निकाळजे या नावाचा ईंग्लिशमध्ये संदर्भ देताना Joy Heartless वापरल्यास अर्थाचा अनर्थ होउ शकतो. :-)
  2. एखाद्या विशिष्ट नावाबद्दल माहिती शोधताना भाषांतरित संदर्भ शोधित-सूचीमध्ये अवतरित होणार नाही. उदा. फोर्ट कॉलिन्स या ठिकाणाबद्दलची माहिती कॉलिन्स किल्ला असे शोधून मिळणार नाही. :-)

अर्थात, जी नावे विशिष्ट नाहीत, त्याचे भाषांतर केलेच पाहिजे. उदा. मिसिसिपी रिव्हर न म्हणता, मिसिसिपी नदी, असाच उल्लेख झाला पाहिजे.

वरील विनंती ही पूर्णत: माझी आहे. त्यात rule enforcementचा भाग नाही.

क.लो.अ.

User talk:अभय नातू

अमेरिकन गृहयुद्ध

[संपादन]

अभय,

वा! सुंदर लेख तयार होत आहे.

इतकी माहिती गोळा करून मुद्देसूदपणे विकिवर लिहील्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

आपणाकडून असे अनेक लेख लिहीले जावोत ही ईच्छा व विनंती.

User talk:अभय नातू

re:अभिनंदन

[संपादन]

अभय,

धन्यवाद. तुमच्यासारख्या अनेक लेखकांनीच हा प्रयत्न समृद्ध केला आहे आणि (नजीकच्याच)भविष्यात तो अधिकाधिक सफल होईल ही खात्री आहे.

मी कारणमात्र.

अभय नातू 05:38, 18 जानेवारी 2006 (UTC)

Hi,

You can upload images here from english wikipedia if they are under GPL or other free licence. also if the image is already on Commons you can directly refere to it as if it is on Marathi wikipedia! Please don't forget to mention original source of the images that you copy.

Thanks and keep up your good work!


कोल्हापुरी 06:31, 2 फेब्रुवारी 2006 (UTC)

^^^^^^^^^^^^^^

What he said :-)

अभय नातू 16:14, 2 फेब्रुवारी 2006 (UTC)

गौरव

[संपादन]

अभयघैसास,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून ,आंतरराष्ट्रीय विषयांवर योगदानाबद्दल सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील आंतरराष्ट्रीय विषयांवर योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar ०२:४३, ३० जानेवारी २००७ (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.