Jump to content

चर्चा:नंदुरबार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

we wants information about list of Villages, Town, Pada, Area & Populations 117.242.80.104 ०६:१४, १४ जुलै २००९ (UTC)in Nandurbar district


नंदूरबार आणि नंदुरबार ... मराठीत काय आणि हिंदीत काय? --अभय होतू (चर्चा) २१:४६, १५ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

@: @अभय नातू: --अभय होतू (चर्चा) २१:५१, १५ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

कोणी तज्ञ आहे का उत्तर द्यायला ? --अभय होतू (चर्चा) ०१:०१, २४ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

नंदुरबार बरोबर आहे. -- अभय नातू (चर्चा) ०४:१७, ४ मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय नातू: मी असे विचारले होते की "मराठीत काय आणि हिंदीत काय?" नंदुरबार बरोबर आहे.... म्हणजे मराठीत असे बरोबर आहे असे सम्जावे काय? की दोन्हीत नंदुरबार असेच आहे असे सम्जावे? --अभय होतू (चर्चा) २२:००, ५ मार्च २०१९ (IST)[reply]

होय, नंदुरबार बरोबर. व्यक्ती, स्थळ व विशेषनामांचे भाषांतर कसे काय करणार? नाही तर कोल्हापुरातील अंबाबाईला मँगोलेडी ऑफ फॉक्सपूर म्हणावे लागेल :-)
अभय नातू (चर्चा) ०९:३८, ६ मार्च २०१९ (IST)[reply]
@अभय नातू:

इथे भाषांतराचा संबंध आलाच कुठे?

मुद्दा असा आहे की मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात, म्हणून व्यक्ती, स्थळ व विशेषनाम यांचे स्पेलिंग दोन्ही भाषात एकसारखेच होइल असे नाही.

उदा. मराठीत सोलापूर तर हिंदीत सोलापुर, मराठीत मुंबई तर हिंदीत मुम्बई, मराठीत पुरूष, तर हिंदीत पुरुष इत्यादी इत्यादी इत्यादी....

तसेच मराठीत नंदुरबार आणि हिंदीत नंदूरबार असे होईल.

उकार, वेलांटी यांचे मराठी/हिंदी मध्ये ऱ्हस्व/दीर्घ अदलाबदल बऱ्याचदा (सर्वत्र नव्हे!) होते

याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. --अभय होतू (चर्चा) २२:३१, ६ मार्च २०१९ (IST)[reply]

नंदूरबार या हिंदी विकिपीडिया पानावर मराठीत मजकूर आहे. :):):):):):):):):) --अभय होतू (चर्चा) २२:३७, ६ मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय नातू: मराठी विकिपीडियावर सर्वत्र नंदूरबार ऐवजी नंदुरबार असे बदल करणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी नंदूरबार आहे. --अभय होतू (चर्चा) २२:४१, ६ मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय होतू आणि अभय नातू: येथे लेखनाचे नियम न लावता, अधिकृत/प्रमाणित नाव काय आहे हे महत्वाचे आहे असे वाटते. हा संदर्भ पहा. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२२, ७ मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय होतू:,
इथे भाषांतराचा संबंध आलाच कुठे?
अहो गंमत केली तर त्यावरुन वाद नको. वाक्याशेवटी स्मायलीही होती!
मराठीत सोलापूर तर हिंदीत सोलापुर, मराठीत मुंबई तर हिंदीत मुम्बई, मराठीत पुरूष, तर हिंदीत पुरुष इत्यादी इत्यादी इत्यादी....
कुलकर्णी यांनी वर लिहिल्याप्रमाणे अधिकृत/प्रमाणित नाव वापरावे. हा नियम अमराठी विशेषनामांना सुद्धा लावावा.
नियम सोडून...इतर भाषेत लिहिताना त्या भाषेनुसार स्वतःचे नाव मुरडणे, मोडणे, फाडणे हे काही बरोबर नव्हे.
मराठी विकिपीडियावर सर्वत्र नंदूरबार ऐवजी नंदुरबार असे बदल करणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी नंदूरबार आहे.
लवकरच सांगकाम्या लावून करुन घेतो.
अभय नातू (चर्चा) ०९:५२, ७ मार्च २०१९ (IST)[reply]
@अभय नातू:

सांगकाम्याबद्दल धन्यवाद.

मी फक्त एक शंका विचारली होती, त्यास "वाद" समजण्याचा गैरसमज करुन घेउ नये. स्मायली

@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:

मराठीतील अधिकृत/प्रमाणित नावच लिहिणे बरोबर आहे हे अर्थातच अत्यंत सत्य असून यात कोणाचेही दुमत नसावे.

@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:@सुशान्त देवळेकर:@Mahitgar:@:@Tiven2240:@V.narsikar:

माझी "शंका": एका हिंदी भाषिक राज्यातील "गोरखपुर" हे हिंदी स्थळ नाव मराठी भाषेत लिहिताना ते गोरखपूर असे होइल; तर मराठी विकिपीडियावर लिहिताना ते

गोरखपुर असे लिहायचे की गोरखपूर असे लिहायचे? --अभय होतू (चर्चा) १९:४५, ७ मार्च २०१९ (IST)[reply]

मराठी विकिपीडिया

[संपादन]

हा मराठी विकिपीडिया आहे, येथे सर्व विशेषनामे मराठीकरण झालेलीच वापरावीत. उदा० न्यूयाॅर्क, न्यू याॅर्क नाही. हाॅंगकाॅंग, हाॅंग काॅंग नाही. मराठीत उपान्त्यपूर्व अक्षरे ऱ्हस्व असतात. त्यामुळे नंदुररबारातला दु ऱ्हस्व. अपवाद जोडशब्द :- आईबाप, मीठभाकर, चाळीसगांव, वगैरे.

संस्कृत शब्दांतले फक्त अन्त्य इकार-उकार मराठीत दीर्घ लिहितात, बाकीचे इकार-उकार नाहीत. त्यामुळे तरुण, पुरुष, मधुर या शब्दांतले उकार ऱ्हस्व. गणित, फलित यांतलेही इकार ऱ्हस्व.

(चर्चा) १९:५९, ७ मार्च २०१९ (IST).[reply]

गोरखपूरमधला पू दीर्घ. पण गोरखपुरातला पु ऱ्हस्व. (चर्चा) २०:३६, ७ मार्च २०१९ (IST)[reply]

हा मराठी विकिपीडिया आहे, येथे सर्व विशेषनामे मराठीकरण झालेलीच वापरावीत. उदा० न्यूयाॅर्क, न्यू याॅर्क नाही. हाॅंगकाॅंग, हाॅंग काॅंग नाही.
पाचव्यांदा (तरी) ठाम विरोध. अहो विकिपीडिया मराठी म्हणून काय वाट्टेल ते?
जी नावे सहजपणे अधिकृत रुपात लिहिता येतात ती तशीच लिहावी.
सहकार्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:०२, ८ मार्च २०१९ (IST)[reply]


@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:@सुशान्त देवळेकर:@Mahitgar:@:@Tiven2240:@V.narsikar:

सदस्य:ज, सदस्य:सुबोध कुलकर्णी आणि सदस्य:अभय नातू यांनी आपले मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद... कारण चर्चा करणे अत्यंत आवश्यक असते, चर्चेशिवाय प्रश्न सुटत नाहीत. यांनी जे मत व्यक्त केले आहे त्यात काहीसे परस्परविरोधी मत आहे असे दिसते. त्यातील कोणाचे म्हणणे योग्य आहे हे ठरविण्याइतका मी तज्ञ नाही. पण माझी एक शंका आहे: जर सुबोध कुलकर्णी आणि अभय नातूंचे म्हणणे मानले तर मराठी विकिपीडिया गोरखपुर असा लेख असेल.... आणि त्याचप्रमाणे हिंदी विकिपीडियावर सोलापूर असा लेख हवा.

(कारण: मराठीत-सोलापूर तर हिंदीत-सोलापुर)‌

पण प्रत्यक्षात हिंदी विकिपीडियावर सोलापुर असा लेख आहे. म्हणजेच हिंदी विकिपीडियावर मराठी गावाचे नाव लिहिताना हिंदी भाषेमध्ये लिहिले जाते, परंतु मराठी विकिपीडियावर हिंदी गावाचे नाव लिहिताना हिंदी भाषेमध्ये लिहिले जावे. असे कसे? माझी दुसरी शंका: गावांची नावे अधिकृत लिहावीत असे या दोघांचे म्हणणे आहे; तर अधिकृत नाव कोणते मानायचे हे कसे ठरवायचे?

उदा. 'मुंबई' हे नाव अधिकृत मानले तर इंग्रजी विकिपीडियावर mumbaee असा लेख हवा!

सगळाच गोंधळ आहे, नक्की कसे लिहायचे तेच समजत नाहीये. --अभय होतू (चर्चा) २३:३१, १० मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:@सुशान्त देवळेकर:@QueerEcofeminist:@:@V.narsikar:, अधिकृत म्हणजे शासनाने नोटिफिकेशनमध्ये नोंदविलेले नाव. प्रत्येक ठिकाणाचे नाव त्या त्या ठिकाणची राज्यभाषा, देवनागरी आणि रोमन लिपीत कसे लिहायचे ते यामुळे निश्चित होते. उदा. मुंबई आणि Mumbai; ಬೆಳಗಾವಿ, बेळगावी, Belgavi. आपण (विकिपीडियावर तरी) बेळगाव, बंबई, Belgaum, Bombay असे लिहिणे चुकीचे आहे. पोस्ट, दूरसंचार, रेल्वे इ. खाती हे नियम पाळतात हे आपल्याला दिसते. येथे लेखन नियम, भाषिक स्वरूप किंवा अभिनिवेश यांना थारा नाही. थोडक्यात, ते स्वातंत्र्य आपल्याला नाही. नावाचे हे रूप आपण केंद्रीय याद्या पाहून ठरवतो. या याद्या जनगणना व इतर संकेतस्थळे येथे उपलब्ध आहेत. या चर्चेच्या निमित्ताने अशा याद्या विकिपीडियात असण्याची गरज आहे हे निश्चित झाले. याबद्दल अभय होतू यांचे आभार. अशा याद्या कोणते संदर्भ देवून बनवाव्या यावर पुढील चर्चा स्वतंत्रपणे करावी असा प्रस्ताव ठेवत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:०४, ११ मार्च २०१९ (IST)[reply]

@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:@सुशान्त देवळेकर:@QueerEcofeminist:@:@V.narsikar:@ज्ञानदा गद्रे-फडके:@आर्या जोशी:,

कर्नाटकातील एका लोहमार्ग स्थानकाचे अधिकृत नाव इंग्रजीमध्ये Vijayapura तर हिंदीमध्ये विजयपुर असे आहे. मराठी भाषेत ते विजयपूर असे होईल.

तरी मराठी विकिपीडियात ते कसे लिहावे?

--अभय होतू (चर्चा) २२:२४, २९ मार्च २०१९ (IST)[reply]

सर्च करून पहिले असता काही संकेतस्थळे, वर्तमानपत्रात, फलक इ. वर रुढपणे मराठीत 'विजयपूर' असेच लिहिले जाते. येथेही असेच लिहावे असे वाटते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५४, ३० मार्च २०१९ (IST)[reply]

=गावाच्या नावांची योग्य लेखनपद्धती

[संपादन]

नमस्कार! सर्व चर्चा वाचल्या. यामधे व्याकरणाचा संबंध तुलनेने मला कमी वाटतो.शासकीय रचनेनुसार त्या त्या गावांची नावे जशी लिहिली जातात त्याला अधिक महत्व द्यावे व तशीच नावे त्या त्या भाषिक विकीने वापरणे अपेक्षित वाटते.शासनमान्य नाव व्याकरणदृष्ट्या चुकीचे असले तरीही नियमानुसार प्रचलित नावच वापरावे.जसे मराठीत नंदुरबार असे असल्यास तेच वापरणे योग्य.त्यासाठी गॅझेटिअर पाहून खात्रीही करून घेता येईल.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १७:०२, ११ मार्च २०१९ (IST)[reply]