Jump to content

चर्चा:स्वाइन इन्फ्लुएन्झा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या रोगाला मराठी नाव आहे का?

डुकर्‍या ताप?

अभय नातू २०:११, १ मे २००९ (UTC)

फ्लू साठी विषमज्वर ही शास्त्रीय संज्ञा आहे. डुकर्‍याज्वर कसे वाटते. अजयबिडवे ०९:३९, २ मे २००९ (UTC)

ह्या रोगाला मराठीत नाव आहे की नाही हे नक्की माहिती नाही. स्वाईन फ्लू हा रोग भारतात कधी कोणाला झाल्याचे ऐकिवात आहे काय? नसेल तर त्याला मराठी नाव असणे अवघड आहे.

अभिजीत साठे १६:०८, २ मे २००९ (UTC)

एन १ एच १ स्वाइन इन्फ्लूएन्झा

व्यक्तिगत माहिती

[संपादन]

या लेखात रुग्णाच्या मृत्यूची माहिती घालणे कितपत धोरणीपणाचे आहे?

ही व्यक्तिगत माहिती रोगाशी संबंधित नाही. तसेच अशी (नावासकट) माहिती घालणे प्रशस्त वाटत नाही.

घातलीच तर २००९मधील पुण्यातील डुकर्‍याज्वराची साथ या लेखात ही माहिती बसू शकेल.

अभय नातू १६:३३, ४ ऑगस्ट २००९ (UTC)

अभय यांच्या मताशी मी सहमत आहे. या लेखात केवळ स्वाइन इन्फ्लूएन्झा बद्दल माहिती असावी.
मात्र २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथ या वेगळ्या लेखात या साथीबद्दलची माहिती असावी. तेथे एका उपविभागामध्ये पुण्यातील मृत्यूबद्दल नोंद असावी.
क्षितिज पाडळकर ०३:१०, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
तसेच डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत हा विकिवर स्वतंत्र लेख असू नये असे वाटते. त्यातून माहिती काढून ती या लेखात टाकता येईल व त्यांना संदर्भ म्हणून त्या संकेतस्थळाकडे निर्देशित करता येईल.
क्षितिज पाडळकर ०३:१३, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
२००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथ येथे माहिती हलवली, अर्थात आपल्या देशात जिथे अफवांच पिक खूप वेगाने पसरून वेगळच काही होऊ शकत तीथे माहिती वस्तुनिष्ठ आणि पूर्ण सविस्तार असावी वगळू नये अस माझ मत आहे. Mahitgar ०५:५१, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
माहिती वस्तुनिष्ठ आणि पूर्ण सविस्तार
मृत व्यक्तीचे नाव या लेखात प्रशस्त वाटत नाही. तरीही आग्रह असल्यास वगळू नये.
अभय नातू ०६:४१, ५ ऑगस्ट २००९ (UTC)