Jump to content

सदस्य चर्चा:Mandards

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार,

शिवाय, en.wikipedia.org वरच्या "Indian Railways" या पृष्ठावर डावीकडच्या भाषांच्या स्तंभात 'मराठी' भाषेची नोंद कशी करायची असते? For that matter, is there some automated process by which, whenever a page is translated to another language, this new language is automatically reflected into the "languages" column in other wikis. Or is this a manual process?

इंग्लिश (किंवा इतर कोणत्याही) विकिपीडियावरील लेखावर मराठीतील लेखाचा दुवा देण्यासाठी त्या पानावर [[mr:भारतीय रेल्वे]] (भारतीय रेल्वेच्या ठिकाणी मराठी लेखाचे नाव) द्यावे. हे काम manually करता येते, तसेच या कामासाठी अनेक आंतरविकि सांगकामे (interwiki bots) काम करीत असतात. हे सहसा स्वयंचलित असतात व अनेक विकिपीडियांवर भटकत अशी दुवेजोडणी करतात. मराठी विकिपीडियावरही अशा अनेक सांगकाम्यांचा राबता आहे.

मराठी विकिपीडियावरील लेखावर त्याच्या इंग्लिश पानाचा दुवा दिल्यास (उदा. [[en:Indian Railways]]) असे सांगकामे हा दुवा उचलुन धरतात व तेथून इतर विकिपीडियांवरील दुवे जोडतात.

अभय नातू ०४:०९, २६ जून २००७ (UTC)

मित्रवर्य आपण आपण मराठी विकिपीडियावर भाषांतरकरण्याचा विचार केलात या बद्दल धन्यवाद,परंतु सहाय्य:Setup For Devanagari‎ हा लेख, ज्यांना इंटरनेटवर आल्या नंतर मराठी अक्षरांच्याजागी चौकोनी डब्बे दिसतात आणि मराठी दिसतच नाही अशा मंडळींना मराठी सुरू कसे करावे या बद्दल आहे त्या मुळे सहाय्य:Setup For Devanagari‎ या लेखाचे शीर्षक आणि मजकुर जानून बुजून इंग्रजीत ठेवला गेला आहे.संगणक टंक हा लेख पूर्ण मराठीतून असण्याकरिता आहे आपण् तेथे योगदान करू शकता तसेच विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प येथे अवश्य भेट द्यावी.

माहीतगार ०४:५३, २४ सप्टेंबर २००९ (UTC)

अभिनंदन

[संपादन]

नमस्कार Mandards,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

विवीध शंका चर्चा

[संपादन]

पृथ्वी चा इतिहास या लेखावर आपले पुढे काम चालु रहाणार असल्यास त्यावर {{काम चालू}} हा साचा लावावा ही विनंती.त्याने आपले त्यातील भाषांतराचे काम सुकर होईल.इंग्रजी (गैरभाषिक मजकुर)मसुदा म्हणुन इतर कोणी ते काढणार नाही.एक सदस्य म्हणुन ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १५:३४, १८ नोव्हेंबर २००९ (UTC)

{{काम चालू}} या साचाचा मूळ उद्देश एखादा सदस्य लगोलग(लगातार) एकाच लेखात खूप सारी संपादने करत असतो तेव्हा इतर तोच लेख त्याच वेळी लेख संपादन करत असलेला सदस्य (खास करून नवागत) अचानक editconflict संदेशाने -(म्हणजे संपादनाकरिता तुम्ही पान उघडले आणि जतन केले या कालावधीत मध्येच इतर सदस्याने त्याचे संपादन जतन केले तर एक विशीष्ट संदेश मिळतो) - गोंधळून जाऊ नये म्हणून लावला जातो.
{{काम चालू}} साचात तुम्ही सोबत संपादन करू शकता असे लिहिले असले तरी अशा लेखात बदल करण्याची पृवृत्ती सहसा कमी होते असे दिसते त्यामुळे त्या साचात लेखात अनेक संपादने करण्याची क्रिया चालू नसेल असे दिसले तर तो साचा काढणे अपेक्षीत आहे.
त्यापक्षी {{भाषांतर}} साचा दिर्घकाळाकरिता ठेवता येतो,आणि भाषांतराची प्रक्रीया दिर्घकाळ चालू राहू शकते.बर्‍याच वेळा सुयोग्य मराठी शब्द असतात पण ऐनवेळेवर नसुचणे किंवा एका बैठकीत वळ न मिळणे अशा गोष्टी होऊ शकतात.त्यावर कालावधीचे बंधन टाकावे असे मला तरी वाटत नाही. फारतर लेख विभागांची नावांचे प्राथमिकतेने मराठीत असावित म्हणजे इतर भाषांतर करणार्‍या व्यक्तिंना उत्साह येतो. भाषांतराची प्रक्रीया चालू असल्याचे त्यातून उमगतेच . असे माझे मत आहे.
इंग्रजी विकितील साचे मराठी विकिपीडियात आणण्या बद्दल ते आधी जसेच्या तसे शीर्षकासहीत मराठी विकित आणावेत व कालांतरा ने सावकाश भाषांतर करावे हा एक मार्ग झाला.(फायफॉक्स वापरत असाल तर विकएडीट या ऍडऑननेने काम लवकर होते)
किंवा साचाचा दृश्य मजकूर तेवढाच मराठी विकिपीडियात भाषांतरीत घेऊन गरजे प्रमाणे साचा अधीक विकसित करत जावा. विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/इतरभाषी विकिपीडिया निती चर्चा संक्षेप विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/प्राधान्य
'over translation' :या विषयावर सध्या कोणताही बंधनकारक संकेत अस्तीत्वात नाही. विकिपीडिया:लेखनभाषा संकेत येथे अधीक चर्चा होऊ शकलीतर हवेच आहे.मी सुद्धा अशा चर्चेत नक्कीच सहभागी होईन.सवडी नुसार विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पाहून घ्यावा.
Microsoft's IME 2 हि अधीक उपयूक्त आहे अस ती वापरणार्‍याच मत आहे,आणि ते बरोबर असेल अस गृहीत धरण्यास काहीच जरकत नाही पण माझ्या सारखे अनेक जणांची गरज म्हणून सध्याची पद्धत बर्‍याच चर्चे नंतर अस्तीत्वात आली आहे आत्ताही मी सध्याची पद्धत वापरून लिहित आहे(मला याक्षणी दूसरा काही पर्याय उपलब्ध नाही) .
अर्थात तुम्ही म्हणता तसे काही प्रश्न भेडसावत आहेत त्यांची व्यवस्थीत नोंद, चर्चा करून निराकरण गरजेचे आहे. या बद्दल काम करणारी मंडळी आणि त्यांच्या वेळेची उपलब्धते प्रमाणे हे काम पुढे जाऊ शकेल . माहितगार ११:५२, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)

मला हा कळफलक नको आहे, काय करू?

[संपादन]
पुढील पर्यायसुद्धा वापरून पहावा,आंतरविकि बॉट्स नॉर्मली याच तंत्राचा वापर करतात. यासाठी [[सदस्य:<सदस्यनाव>/monobook.js]] नावाचे नवीन रिकामे पान तयार करा. <सदस्यनाव> ऐवजी तुमचे नाव वापरा.

माहितगार १२:०५, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)

विकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा

[संपादन]

210.211.251.160 १२:३१, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)

मोनोरेल

[संपादन]

आपणास अपेक्षित बदल केला आहे.मोकळया चर्चेबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०८:३२, २८ जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३३, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

आंतरभाषिक दुवे

[संपादन]

उच्चारापेक्षा अधिक माहिती थेट उपलब्ध करून देण्यासाठी अन्य भाषिक विकिपीडियावरील लेखाचा मजकुरांतर्गत आंतरविकी दुवा देण्याचा आपला इरादा अगदी ग्राह्य आहे (तुम्ही कॅमेरा लेखात जाऊन तशी दुरुस्ती करू शकता.) (संदर्भ : en:Wikipedia:Interlanguage_links, en:Wikipedia:Interwikimedia_links). परंतु अन्य काही विकिकरांकडून अन्य काही लेखांमध्ये मजकुरादरम्यान अन्य भाषिक विकिपीडियांचे आंतरविकी दुवे मोठ्या प्रमाणावर पेरण्याचे प्रकार पाहायला मिळाले आहेत. असे दुवे अन्य भाषिक विकिपीडियावरील लेख चटकन उपलब्ध करून देतीलही, पण मजकुरात असे अन्य लिप्यांमधील शब्द बचाबच मध्ये आल्याने घास चावताना खडे लागण्यासारखे वाटू लागते. तुम्ही कॅमेरा या सदरात एकच दुवा नोंदवला होतात, त्याबद्दल विशेष अडचण नाही; मात्र वरील त्रासदायक अनुभव इतरत्र आल्यामुळे मी याबद्दल अधिक जागरूक राहतो (आणि विद्यमान संदर्भात कदाचित वाजवीपेक्षा अधिक जागरूक झालो असेन. क्षमस्व.). परंतु या सुविधेच्या संभाव्य गैरवापराचा एकंदरीत विचार करता एक धोरणात्मक विवेक आपण सर्वांनी पाळायला हवा : शक्यतो मराठी विकीवरील लेखविषयाशी थेट संबंधित असलेल्या अन्य विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकी दुवा मजकुरांतर्गत *एकदाच* जडवावा; आणि हेदेखील तेव्हाच करावे, जेव्हा तो शब्द मराठीतील नावाची व्युत्पत्ती सांगणारा (जसा ताज्या मासल्यातील 'कॅमेरा ऑब्स्क्युरा' )असेल किंवा मराठीतील शीर्षकाची विशिष्ट अर्थच्छटा अचूक मांडणारा असेल.

यामागची प्रामाणिक भूमिका तुम्हांला समजेल अशी आशा बाळगतो. घाईघाईत हा संदेश लिहिताना काहीसा त्रोटक लिहिला गेला असण्याची शक्यता आहे; त्याबद्दल आणि कॅमेरा आब्स्क्युराविषयक गैरदुरुस्तीबद्दल क्षमस्व.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०८, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.