विवेकसिंधु
Appearance
विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज[१] या कवीने लिहिला. हरिहरनाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास 'मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा' अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले. त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा(सध्याच्या नागपूर जिल्ह्यात) येथे बसून हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० (म्हणजेच इसवी सन ११८८) सालातील असावी.[२] या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे. ओव्यांची संख्या १७०० आहे.[३]
ओवी
[संपादन]“ | वेदशास्त्रांचा मथितार्थु । मऱ्हाटिया जोडे फलितार्थु । तरि चतुरीं परिमार्थु । कां नेघावा ॥१॥ |
” |
हे सुद्धा पहा
[संपादन]- जैतपाळ
- या लेखाचे चर्चापान
संदर्भ
[संपादन]- ^ "First Poet Shri.Mukundraj, Ambajogai | District Beed, Government of Maharashtra | India" (इंग्रजी भाषेत). 2024-11-08 रोजी पाहिले.
- ^ शफी पठाण. "सासवडमध्ये तरी विवेकसिंधूला न्याय मिळेल?". ०३ जानेवारी,२०१४ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ रापतवार, सुदर्शन (15 October 2024). मंदिराचे गाव. Ambajogai: माध्यम पब्लिकेशन. p. 80. ISBN 9788190278775.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |