समाजवादी पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजवादी पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. हा पक्ष जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केला. सध्या मुलायम सिंग यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलिकडच्या काळात मुंबईत या पक्षाने वर्चस्व वाढवले आहे. २००८ मध्ये मराठी भाषिकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तीपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती.Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.