राजा रविवर्मा
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| राजा रविवर्मा | |
|---|---|
राजा रवि वर्मा, (मल्याळम भाषा:രാജാ രവി വര്മ ; रोमन लिपी: Raja Ravi Varma ;) (एप्रिल २९, इ.स. १८४८- ऑक्टोबर २, इ.स. १९०६) हा भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होता.त्याने भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांचे चित्रण केले. त्यांच्या चित्रांची खासियत म्हणजे भारतातिल परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि धर्मग्रंथांवर काढली गेलेली चित्रे.
वर्म्याला त्याच्या साडी घातलेल्या स्त्रीया सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यपूर्ण चित्रासाठी ओळखले जाते. सन इ.स. १८७३ मध्ये, व्हियेना कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो प्रकाशझोतात आला.तो वयाच्या ५८ व्या वर्षी सन इ.स. १९०६ मध्ये मृत्यू पावला. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.
अनुक्रमणिका |
प्रारंभिक जीवन [संपादन]
राजा रवि वर्म्याचा जन्म केरळच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातिल किलिमनुर राजवाड्यात रवि वर्मा कोईल थंपुरन येथे झाला. त्याचे वडिल मोठे विद्वान व आई ही कवयत्री होती. त्याच्या आईने लिहीलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रवि वर्म्याने तिच्या मृत्युनंतर प्रसिद्ध केले. त्याला सी.गोडा वर्मा, [[राजा राज वर्मा[ हे भाउ व मंगला बायी या नावाची बहिण होती.त्याच्या बाल्य काळातच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. [१].
कला जीवन [संपादन]
इ.स. १८७३ मध्ये, व्हिएन्ना कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो प्रकाशझोतात आला. त्याने चित्रकारीच्या विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतियांस त्यांच्या धर्मग्रंथांतिल द्रुष्ये साकारण्यास मदत झाली.त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली.
आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवम्र्याचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील किलिमनूर येथे झाला. त्यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा त्यांच्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला, तसेच महाराजांच्य प्रोत्साहनामुळेही त्यांना प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांमुळे तैलचित्र काढाण्याचा निश्चय त्यांनी केला.
युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळय़ाजवळील मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पुजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले.
आपल्या चित्रातून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. वयाच्या ५८ व्या वर्षी २ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.
राजाची पदवी [संपादन]
इ.स. १९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्ण पदकाने सन्मानित केले.त्यावेळेस त्याचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविल्या गेले. [१]. इ.स. १९९३ मध्ये,नवी दिल्ली येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरविल्या गेले.त्याने भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणुन केरळ सरकारने त्याचे नावाने राजा रवि वर्मा पुरस्कार सुरू केला जो, प्रतिवर्षी, कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्राविण्य दाखविणार्यांना दिला जातो.
[मावेलिकरा]], केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे.
मुख्य कामांची यादी [संपादन]
राजा रवि वर्म्याच्या प्रमुख कामांची यादी -
|
|
-
भिष्म प्रतिज्ञा
-
शकुंतला , महाभारतातील एक पात्र
-
द्रौपदी दुध नेताना
संदर्भ व नोंदी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- रवि वर्म्याची तैलचित्रे*
- राजा रवि वर्म्याची चित्रे
- राजा रवि वर्म्याची चित्रे
- थोड्क्यात आत्मचरित्र
- रवि वर्मा मुद्रणालयातिल संकलन
- कामत.कॉम वरील मोठे संकलन
- तैलचित्राद्वारे जिवन
- Indian Art Circles: राजा रवि वर्मा
- द हिन्दु:राजसी कलाकार
- चंदिगड वस्तुसंग्रहालय:नउ निपुण
- वर्णम्: रवि वर्म्याची शिळाचित्रे सापडली
- २० व्या शतकाच्या पूर्वार्धातिल पोस्टकार्डस्