कुस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुस्को
Cusco

Cuscoinfobox.png

Flag of Cusco.svg
ध्वज
Escudo del Cusco.png
चिन्ह
कुस्को is located in Peru
कुस्को
कुस्कोचे पेरूमधील स्थान

गुणक: 13°31′30″S 71°58′20″W / -13.525, -71.97222

देश पेरू (देश) ध्वज पेरू
प्रदेश कुस्को
क्षेत्रफळ ७०,०१५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ११,१५२ फूट
लोकसंख्या  (२००७)
  - शहर ३,५८,९३५
www.municusco.gob.pe


कुस्को (स्पॅनिश: Cuzco; क्वेचुआ: Qusqu किंवा Qosqo) हे पेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात आन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून ह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.

ऐतिहासिक इंका साम्राज्याची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडिला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: