मराठी शुद्धलेखन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसर्या मुद्द्यांचे पालन करून शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणॆ अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे.पुढे वाचा
- १. प्रत्येक शब्दातील अक्षरांची निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)पुढे वाचा
- २. शब्दांपासून योग्य तो काळ वापरून व योग्य शब्दरचना करून व्याकरणशुद्ध वाक्ये बनवणे. पुढे वाचा.
- ३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्किकदृष्ट्या मेळ असणे. पुढे वाचा.
- ४.अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प येथे वाचा.
- ५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? येथे वाचा.
[संपादन] साधारणतः होणार्या चुका
शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणार्या चुका या र्हस्व/दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा. वाळंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम मनोगत व मायबोलीयेथे उपलब्ध आहेत.
[संपादन] पहिल्या मुद्द्यासाठी
शिक्षणशास्त्रातील 'उदाहरणातून शिक्षण' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य वर्णविन्यास (Spelling) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती विक्शनरी प्रकल्पाकडे स्थानांतरित केली जावी.
[संपादन] शुद्धलेखनाचे नियम
- महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य महामंडळ पुरस्कृत नियम:
[संपादन] शीघ्र संदर्भ
[संपादन] स्वर
अ - आ - ऍ - ऑ - इ - ई - उ - ऊ - ऋ - ॠ - लृ - लॄ - ए - ऐ - ओ - औ - अं - अः
[संपादन] व्यंजन
क वर्ग - क ख ग घ ङ च वर्ग - च छ ज झ ञ ट वर्ग - ट ठ ड ढ ण त वर्ग - त थ द ध न प वर्ग - प फ ब भ म य वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ
[संपादन] मुळाक्षर अ
| अडविणे | अडवणूक |
[संपादन] मुळाक्षर क
| किरण | उदा. सूर्यकिरण |
[संपादन] मुळाक्षर प
| पूर्व |
[संपादन] मुळाक्षर भ
| भरपूर | भावी | भूक |
[संपादन] मुळाक्षर म
| माहिती | उदा. | मूळ | उदा. झाडाची मुळे | मौसमी |
[संपादन] मुळाक्षर र
| रूप | उदा. स्वरूप |
[संपादन] मुळाक्षर स
| सुगम | सुगरण | सुंदर | सुरक्षित | सुलभ | सुवासिक | सूर्य | उदा. सूर्यप्रकाश |
[संपादन] फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा
फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/
फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.
एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता. डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. (वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]
[संपादन] हे सुद्धा पहा
- मराठी शुद्धलेखन
- अशुद्धलेखन
- मराठी साहित्य महामंडळाचे शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम
- परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे
- भाषाशुद्धी चळवळ
- विरामचिन्हे
- पद
- मराठी व्याकरण
- वर्ग:शुद्धलेखन
- विक्शनरी प्रकल्पाकडे
- सांगकाम्या
- मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे?
- मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?
- मराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची
- विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प

