अनुनासिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ङ्, ञ्, ण्, न्, म् या पर-सवर्णाने प्रदर्शित उचारांना अनुनासिके म्हणतात.

अनुक्रमणिका

[संपादन] उदाहरणे

मुळपर-सवर्ण उच्चारणाने प्रदर्शित शुद्धलेखनाचे नियमासअनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी या रकान्यात दिल्या प्रमाणे अनुस्वार देऊन लिहावे
दङ्गा दंगा
झाञ्ज, झांज,
बण्ड,पाण्डे बंड,पांडे
खन्त,यन्दा,कान्दा,रान्धा खंत,यंदा,कांदा,रांधा,
सम्प संप

[संपादन] तत्सम

तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणार्‍या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.पहा शुद्धलेखनाचे नियम

पर-सवर्णाच्या या रकान्यात दिल्या प्रमाणे अनुस्वार देऊन लिहावे किंवा शुद्धलेखनाचे नियमासअनुसरून मुळपर-सवर्ण उच्चारणाने लिहिण्यास हरकत नाही
पंकज पङ्कज',
पंचानन पञ्चानन,
पंडित पण्डित,
अंतर्गत अन्तर्गत,
अंबुज अम्बुज.

[संपादन] कंस अंश

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.

  • उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.

[संपादन] हे सुद्धा पहा

वैयक्‍तिक साधने