आंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबा
झाडाला लागलेल्या कैर्‍या
झाडाला लागलेल्या कैर्‍या
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Magnoliophyta
जात: Magnoliopsida
वर्ग: Sapindales
कुळ: Anacardiaceae
जातकुळी: Mangifera
L.
जीव

More than 50 जीव; see listing

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाडफळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१]

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

[संपादन] आंब्याचे झाड

आंब्याचा मोहोर
आंब्याचा मोहोर

आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर उंच असते. त्याची त्रिज्या साधारणपणे १० मीटर एवढी असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पाने डहाळीला एकाड एक येतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटीमीटर लांब तर ६ ते १६ सेंटीमीटर रूंद एवढा असतो. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामधे येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील "drupe" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमधे कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटीमीटर लांब तर व्यास ७ ते १२ सेंटीमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन २.५ किलोग्रॅम पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहूतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलीमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटीमीटर लांबी, ३ ते ४ सेंटीमीटर रुंदी आणि १ सेंटीमीटर जाडीचे एकच बी असते.

[संपादन] प्रकार

[संपादन] संदर्भ


वैयक्‍तिक साधने