दुर्ग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम(कठीण) असते असे बांधलेले ठिकाण. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो.
अनुक्रमणिका |
दुर्गांचे प्रकार[संपादन]
प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
मनुस्मृती[संपादन]
मनुस्मृतीत आढळणारे किल्ल्यांचे प्रकार-
- घनदुर्ग
- महीदुर्ग
- अष्दुर्ग
- वार्क्षदुर्ग
- नृदुर्ग
- गिरीदुर्ग
देवज्ञविलास ग्रंथ[संपादन]
लाला लक्ष्मीधर याने राजा कृष्णदेवराय च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार)
- गिरीदुर्ग
- वनदुर्ग
- गव्हरदुर्ग(गुहेचा किल्ला म्हणून उपयोग)
- जलदुर्ग
- कर्दमदुर्ग (दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला)
- मिश्रदुर्ग (वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करून बांधलेला)
- ग्रामदुर्ग
- कोट (सभोवताल लाकूड वापरून तयार केले संरक्षण)