मनमोहनसिंग
| मनमोहनसिंग | |
|
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण मे १९, इ.स. २००४ |
|
| राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
|---|---|
|
|
|
| जन्म | सप्टेंबर २६, इ.स. १९३२ गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
| राष्ट्रीयत्व | भारत |
| राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| पत्नी | गुरुशरण कौर |
| अपत्ये | ३ |
| धर्म | शीख धर्म |
मनमोहनसिंग (मराठी लेखनभेद: मनमोहन सिंग ; पंजाबी: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Manmohan Singh) (सप्टेंबर २६, इ.स. १९३२; गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत - हयात) हे भारताचे १७वे पंतप्रधान (विद्यमान, मे २२, इ.स. २००४पासून) आहेत. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत सध्या आसामाचे प्रतिनिधित्व करतात. हे भारताचे पहिले शीख धर्मीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीही होते. त्या काळात यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
[संपादन] आरंभिक जीवन
त्यांचा जन्म सप्टेंबर २६, इ.स. १९३२ रोजी गाह, पश्चिम पंजाब (आता पाकिस्तान मध्ये) झाला. ते अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात कार्यरत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी सिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
| मागील अटलबिहारी वाजपेयी |
भारतीय पंतप्रधान मे २२, इ.स. २००४-विद्यमान |
पुढील --- |
| मागील नटवर सिंग |
भारतीय परराष्ट्रमंत्री नोव्हेंबर ७, इ.स. २००५- ऑक्टोबर २४, इ.स. २००६ |
पुढील प्रणव मुखर्जी |
| मागील यशवंत सिन्हा |
भारतीय अर्थमंत्री इ.स. १९९१-इ.स. १९९६ |
पुढील जसवंत सिंग |
| मागील डॉ. आय.जी. पटेल |
रिझर्व बँकेचे गव्हर्नर जानेवारी १५, इ.स. १९८५-फेब्रुवारी ४, इ.स. १९८५ |
पुढील अमिताव घोष |
|
|||||