भारतीय रिझर्व्ह बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय रिझर्व बॅंक
Reserve Bank of India
भारतीय रिज़र्व बैंक
रिझर्व्ह बँकेचा लोगो भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय
रिझर्व्ह बँकेचा लोगो भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय
मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र
अक्षांश - रेखांश 18°55′58″N 72°50′13″E / 18.93278, 72.83694
स्थापना इ.स. १९३५
गव्हर्नर रघुराम राजन
देश भारत ध्वज भारत
चलन रुपया
ISO 4217 Code INR भारत ध्वज भारत
गंगाजळी US$300.21 billion (2010)
संकेतस्थळ -


भारतीय रिझर्व बॅंक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बॅंक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बॅंक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

प्रमुख उद्देश[संपादन]

भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
  • भारताची गंगाजळी राखणे.
  • भारताची आर्थिक स्थिती राखणे.
  • भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

इतिहास[संपादन]

भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारीशीनुसार[१] भारतीय रिझर्व बॅंक कायदा १९३४ अन्वये एप्रिल १, १९३५ रोजी करण्यात आली. बॅंकेचे प्रमुख कार्यालय प्रथमपासुनच मुंब‌ई येथे असून येथुनच बॅंकेचे प्रमुख कार्य चालते.या बँकेने ब्रम्हदेशची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल,१९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून,१९४८ पर्यंत काम पाहिले. सुरुवातीस बॅंकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु इ.स. १९४९पासून बॅंक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे.

गव्हर्नर[संपादन]

भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात.

सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रील १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही.

त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.

आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत.

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]