भारतीय रुपया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपयाच्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या.


भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटानाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे बनविल्या जातात. रुपया हा शब्द संस्कृत मधील रुपे (चांदी) या शब्दापासून आला आहे. २००५ साली बनवली जाणारी चलने (नाणी व नोटा) खालीलप्रमाणे आहेत:

[संपादन] नोटा

सध्या पाच रुपयांपासून १,००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत.

[संपादन] सध्या चलनात असलेल्या नोटा

महात्मा गांधी श्रेणी [१]
सुलट बाजूचे चित्र मुल्य आकार मुख्य रंग वर्णन चलनात आल्याचे वर्ष
सुलट उलट
५ रुपये ११७ × ६३ मिमी हिरवा महात्मा गांधी ट्रॅक्टर इ.स. २००२
१० रुपये १३७ × ६३ मिमी नारंगी-जांभळा गेंडा, हत्ती, वाघ इ.स. १९९६
२० रुपये १४७ × ६३ mm लाल-नारंगी ताडाचे झाड इ.स. २००२
Rs. 50 १४७ × ७३ mm जांभळा भारतीय संसद इ.स. १९९७
Rs. 100 १५७ × ७३ mm मध्यात निळा-हिरवा, कडेला खाकी हिमालय इ.स. १९९६
-- ५०० रुपये १६७ × ७३ mm हिरवा-खाकी व पिवळा दांडी यात्रा इ.स. १९९७
पिवळा इ.स. २०००
१,००० रुपये १७७ × ७३ mm गुलाबी भारताचे अर्थतंत्र इ.स. २०००

येथील चित्रे ०.७ पिक्सेल प्रति मिलिमीटर, या प्रमाणात चित्रित केलेली आहे. हे प्रमाण जगातील सर्व चलनी नोटांच्या बाबतीत लागू होते.

[संपादन] नाणी

पुरातन नाणी
२५ पैसे

खालील चलने नाण्यांच्या रुपात वापरली जातात:

  • ५ रुपये
  • २ रुपये
  • १ रुपया
  • ५० पैसे
  • २५ पैसे
  • १० पैसे (हल्ली फार प्रचलित नाही)
शंभर रुपये
२० पैसे
वैयक्‍तिक साधने