चक्रवाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्राम्हणी बदक या पानावरून पुनर्निर्देशित)
चक्रवाक, ब्राह्मणी बदक
Ruddy shelduck arp.jpg
शास्त्रीय नाव Tadorna ferruginea (Pallas)
कुळ कादंबाद्य (Anatidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Ruddy Shelduck
Brahminy Duck
हिंदी सुरखाब

अनुक्रमणिका

[संपादन] वर्णन

चक्रवाक हा साधारण ६६ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा आहे याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट, मानेभोवताल काळे वर्तूळ, पंखात काळे, पांढरे आणि हिरवे पट्टे, शेपूट काळी असा असतो तर मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट आणि मादीच्या मानेभोवती काळे वर्तूळ नसते.

[संपादन] वास्तव्य/आढळस्थान

चक्रवाक हे बहुत करून भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीनचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थीत चालू शकतात.

[संपादन] खाद्य

पाण वनस्पती, पाण कीटक, मासे, सर्पट, मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.

[संपादन] प्रजनन काळ

हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात दक्षिण भारतात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ चक्रवाक पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत, पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढर्‍या रंगाची अंडी देते.

[संपादन] इतर

चक्रवाक पक्ष्याला ब्राह्मणी बदक असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते इंग्लिश भाषेतील पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगछटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.

हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी पक्षी निरीक्षक तिबेटमधील मानसरोवराला हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.

[संपादन] चित्रदालन


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये