वनस्पती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनस्पतींमधील विविधता

हालचाल करु न शकणारे बहुपेशीय सजीव, वनस्पतींमध्ये झाडे, झुडुपे, वेली, शेवाळेकवक यांचा समावेश होतो असा सामान्य समज आहे परंतु तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पॉंज सारखे प्राणीही हालचाल करु न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. या खेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.

वनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज्‌‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी :(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखरस्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि परागअंडपेशी यांचे उत्पादन.

वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराचे असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.


[संपादन] भारतिय पुराणकालीन पार्श्वभुमी

en:Wikipedia:Plant या पानावरुन भाषांतरीत


वनस्पती हा मुळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असुन व्यापक स्वरुपात वनस्पती साम्राज्य।वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे.तरीही,चरक संहिता।चरक संहितेनुसारसुश्रुत संहिता।सुश्रुत संहितेनुसार आणी वैशेषिका।वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्‍या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरल्या गेला आहे.


ऋग्वेद।ऋग्वेदानुसार वृक्ष,औषधी वृक्ष आणी वेली या तिनच विभागणी आहेत.यातिल उपविभाग-विशाखा,क्षुप,व्रताती,प्रतानवती इ.आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते,फुले व फळे येणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फळवती विभागात.'करीर' म्हणुन निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यात आहे.


अथर्ववेद।अथर्ववेदात वनस्पतींचे या -विशाख,मंजीरी,स्तंभिनी,प्रस्तानवती,एकाक्षांग,प्रतानवती,अंशुमती,कांडीनी- आठ वर्गात वर्गीकरण तर तैतरिय आणी वाजसेनिय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत. मनुस्मृतीत ८ प्रमुख् वर्ग आहेत. चरक संहिता।चरक संहितेनुसारसुश्रुत संहिता।सुश्रुत संहितेनुसार पण वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे. पाराशर , वृक्षायुर्वेद चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे.(द्विदल व एकदल).व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.

[संपादन] मध्यकाल

मध्यकाळातही,उदयन,धर्मोत्तर,गुणरत्न,व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी त्यात भर घातली आहे.

इतर भाषांमध्ये